पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने अ.भा.ग्राहक पंचायत तर्फे शुभेच्छा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, January 6, 2020

पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने अ.भा.ग्राहक पंचायत तर्फे शुभेच्छा.माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस प्रतिनिधी संजय हुलगे : ता .माळशिरस पोलिस स्थापना दिनाच्या निमित्ताने अ.भा. ग्राहक पंचायत तर्फे पंढरपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये भेट देऊन वरीष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचा जिल्हा संघटक शशिकांत हरिदास यांच्या हस्ते गौरव करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दयानंद गावडे रुजू झाले पासुन शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत.महिलाच्या सुरक्षेसाठी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करून त्यांना स्वसंरक्षणासाठी आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पोलिस कटीबध्द असल्याचे दाखवून दिले आहे.
शहर पोलिस स्टेशनमध्ये सर्वत्र स्वच्छता अभियान राबवुन परिसर स्वच्छ केला आहे त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेने स्वच्छ कार्यालय म्हणून शहर पोलीस स्टेशनला नुकतेच प्रमाणपत्र दिले आहे.
त्याचबरोबर  सर्वसामान्य माणसाला, नागरिकांना तेथे चांगली वागणूक मिळत असल्याने पोलिस हे मित्र आहेत हे निदर्शनास येत आहे.नुकतेच अधिक्षक कार्यालयाचे तपासणी मध्येही या पोलीस स्टेशनने अव्वल स्थान मिळविले आहे.यासर्व बाबींचा विचार करून अ.भा. ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक शशिकांत हरिदास, जिल्हा सचिव दीपक इरकल, तालुका संघटक विनय उपाध्ये,प्रसिध्दी प्रमुख सुहास निकते धनंजय पंधे  पोलीस अधिकारी वाघमोडे,कर्मचारी यांना भेटून अभिनंदन करून त्यांचा गौरव केला.No comments:

Post a Comment

Advertise