Type Here to Get Search Results !

वरकुटे मलवडी येथे सावित्रीबाई फुले जयंतीस कर्मठांचा विरोध; ग्रामस्थांच्यात संतापाची लाट.


             
माणदेश एक्सप्रेस न्यूज 
रकुटे-मलवडी/प्रतिनिधी : वरकुटे-मलवडी ता.माण येथील आण्णाभाऊ साठे सभागृहात ग्रामस्थांच्या वतीने आणि सरपंच बाळकृष्ण जगताप यांच्या परवानगीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ वी साजरी होणारी जयंती काही कारणास्तव काही कर्मठ तरुणांनी होवू दिली नाही. यामुळे ग्रामस्थांच्यात संतापाची लाट उसळली असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून जाहिर निषेध व्यक्त केला जात आहे..
      याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरकुटे मलवडीच्या एस टी स्टँड परिसरात वर्दळीच्या ठिकाणी आण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह हे जिल्हा परिषद २० टक्के मागासवर्गीय सामुदायिक योजना यामधून ५ लाख व माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती शिवाजीराव शिंदे यांच्या जिल्हा परिषद फंडातून उभारले आहे.यामध्ये ग्रामस्थांच्या वतीने सर्वच महापुरूषांच्या जयंती आणि पुण्यतीथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम करण्यात येतात. या अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच व गावातील सर्वच जातीधर्माचे लोक एकत्रितपणे जमून महापुरुषांचे विचार ग्रहण करीत समाधानाने अभिवादन करतात.यामुळे जनसामान्यांचे प्रबोधन होत असून,समाजीक ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न होतात. परंतु आशा सामाजिक कार्यास अडथळा निर्माण करुन, ठराविक समाजकंटकाद्वारे सामाजिक तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आशा प्रकारचे सामाजिक उपक्रम गावात राबवले जावू नयेत. तळागाळातील बहुजन समाज हा अज्ञान आणि अंधकारात खितपत राहिला पाहिजे. असे वाईट विचार मनात बाळगून, व्यसनाधीन समाजकंटकांना हाताशी धरुन अंधारात तिर चालवणारा खरा सुत्रधार कोण ? सबंधितांकडून त्यास वेळीच समज देण्यात यावी, व गावात एकमेव असलेले सामाजिक सभागृह थोर महापुरुषांच्या अभिवादन कार्यक्रमास खुले करुन द्यावे. याबाबत वरकुटे-मलवडी नागरिकांच्यात चर्चा चालू असून याबद्दल तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 आपल्या गावात घडले ते गावाच्या हिताचे नाही. ज्या सावित्रीमाईंनी सोशीत, वंचित समाजासाठी अहोरात्र कष्ट घेतले.आज त्यांच्याच अभिवादन कार्यक्रमासाठी सभागृह मिळत नाही.हे खरचं दुर्दैव आहे.विद्यमान सरपंच बाळकृष्ण जगताप यांनी यामध्ये लक्ष घालून हे सभागृह सर्व महान थोर पुरुषांच्या जंयती व पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमासाठी खूले करावे. आणि त्याचे सर्व अधिकार ग्रामपंचायतीकडेच राखून ठेवले पाहिजेत.
         
                                                           जालिंदर वाघमोडे
                                             सामाजिक कार्यकर्ते वरकुटे-मलवडी

 ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात उभ्या असलेल्या सर्वच समाजमंदिरे,सामाजिक सभागृहात महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रमासाठी खुली करावीत.या सर्व सामाजिक ठिकाणे ग्रामपंचायतीची मालमत्ता आहे.त्याचे सर्व अधिकार वरकुटे-मलवडी ग्रामपंचायतीने घ्यावेत.सन्माननीय सरपंच यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घ्यावी. व सदरच्या सभागृहावर वयक्तिक मालकी दाखवणाऱ्यांंवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.यापुढे निर्भयपणे सर्व महापुरुषांच्या जयंती,पुण्यतीथी कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी.
                                                           महादेव काटकर
                                              सामाजिक कार्यकर्ते वरकुटे-मलवडी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies