रत्नत्रय शैक्षणिक संकुलात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, January 4, 2020

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस प्रतिनिधी संजय हुलगे : सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.

अठराव्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज १८९वी जयंती आहे. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती.
मांडवे येथील रत्नत्रय शैक्षणिक संकुलात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी मुख्याध्यापक दैवत वाघमोडे व समीर देशपांडे पर्यवेक्षक सतीश हांगे सर्व विभागाचे विभाग प्रमुख सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता सहावी सेमी च्या विद्यार्थ्यांनी केले

No comments:

Post a Comment

Advertise