डेंग्यू बाबत उपाययोजना व जनजागरण. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 11, 2019

डेंग्यू बाबत उपाययोजना व जनजागरण.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/ संजय हुलगे : जि.प.प्राथ.शाळा, शेरीवस्ती ता माळशिरस येथे डेंग्यू ताप उपाययोजना व जनजागरण मोहिमेअंतर्गत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर इस्लामपूर येथील डॉ. सुनिल पवार यांनी शाळेतील विद्यार्थी व पालकांना डेंग्यूतापा विषयी सखोल मार्गदर्शन केले. पालकांनीही यावेळी या तापाविषयी डॉक्टरांना प्रश्न विचारून माहिती घेतली. 
यावेळी इस्लामपूर गावचे सरपंच साहेबराव देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास धाईंजे, नितीन देशमुख व पालक हजर होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. पवार यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ताही पाहिली व समाधान व्यक्त करुन शाळेसाठी रोख बक्षीस दिले. यावेळी संतोष महामुनी  व आप्पासाहेब गोरड  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise