लिटल एंजल स्कुलमध्ये वार्षिक क्रीडासप्ताह उत्साहात साजरा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 11, 2019

लिटल एंजल स्कुलमध्ये वार्षिक क्रीडासप्ताह उत्साहात साजरा.

माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : गारवडपाटी येथील लिटल एंजल स्कुलमध्ये वार्षिक क्रीडासप्ताह तसेच विविध वैयक्तिक तसेच सांघिक स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले  शिशुवर्धा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. वैयक्तिक खेळ  त्यामध्ये धावणे, लांब उडी, उंचउडी, बकेटमध्ये बॉल टाकणे, बकेटमध्ये पैसे टाकणे, संगीत खुर्ची, पोत उडी, लिंबू चमचा त्याचप्रमाणे सांधिक खेळ खो-खो, कब्बडी, लंगडी खेळ घेण्यात आले. त्यामध्ये उत्कृष्ठ खेळाडू मुले साई शिर्के, अर्जुन रणनवरे, ओम मगर, संस्कार पवार, गणेश बाबर, शुभम कोळेकर, ऋतुराज पवार, पृथ्वीराज पवार, रणधैर्य माने, आरुष जाधव, प्रथमेश माने,  संस्कृती रणनवरे, काव्याश्री पवार, रिया मगर, सिद्धी सुळ, श्रेया शिंदे, श्रावणी रणनवरे, प्रतिक्षा मगर, स्वरा शिंदे, प्रियंका पिंगळे यांना गौरविण्यात आले. क्रीडासप्ताह यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Advertise