आटपाडी मराठी चित्रपटसृष्टी तंत्रज्ञान विकासाचे केंद्र व्हावेः प्रा.बापू चंदनशिवे. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 23, 2019

आटपाडी मराठी चित्रपटसृष्टी तंत्रज्ञान विकासाचे केंद्र व्हावेः प्रा.बापू चंदनशिवे.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी :  पश्चिम महाराष्ट्रातील आटपाडी हे साहित्य आणि चित्रपट सृष्टीचा महत्त्वपूर्ण वारसा असणार्याी गदिमांचे गाव आहे. त्यामुळे नव्या पिढीसाठी आटपाडीमध्ये चित्रपट सृष्टीच्या तंत्रज्ञान करिअर विकासाचे केंद्र निर्माण करण्याची खूप मोठी संधी आहे, असे मत न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर येथील संज्ञापन अभ्यास विभागाचे विभाग प्रमुख प्रा.बापू चंदनशिवे यांनी व्यक्त केले. 
आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयामध्ये अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत "दृकश्राव्य माध्यमातील अभ्यासक्रमाचे स्वरूप व संधी " या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथम सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून "दृकश्राव्य माध्यमातील अभ्यासक्रमाचे स्वरूप व संधी"  या विषयावर ते बोलत होते. पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय लोंढे होते. दुसऱ्या सत्रामध्ये "चित्रपट निर्मिती कशी करतात ? " या विषयावर श्री. उमेश मालन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्षस्थान प्रा. बालाजी वाघमोडे यांनी भूषविले. कार्यशाळा संयोजन समितीचे चेअरमन डॉ.किशोर जाधव यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले
 प्रा.बापू चंदनशिवे पुढे म्हणाले की, पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधील कलाकारांची, दिग्दर्शकांची मराठी चित्रपटसृष्टी मधील मक्तेदारी हळूहळू कमी होत असून ग्रामीण खेडोपाड्यातील लोकांच्या जीवनातील सुखदुःखे, ग्रामीण बोलीभाषा जिवंतपणे, सकसपणे अनेक चित्रपटांमधून येत आहे. नागराज मंजुळे, भाऊ कराडे यासारख्या ग्रामीण भागातील दिग्दर्शकांनी पारंपरिक प्रेम, कृत्रिमपणा या विषयांना फाटा देत ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुला-मुलींना चित्रपटाचे नायक बनवून प्रेमाची नवी संकल्पना तयार केली. 'फॅन्ड्री' , 'सैराट' , 'बबन', 'ख्वाडा' यासारखे दर्जेदार मराठी चित्रपट निर्माण करुन ग्रामीण भागातील नव्याने करिअर करणार्या् मुलांना प्रेरणेची वाट निर्माण करुन दिली. दृकश्राव्य माध्यमांमध्ये आज मुलांना नवनवीन करिअरच्या संधी उपलब्ध असून याकडे त्यांनी वळणे गरजेचे आहे. त्याकरिता चौकस राहून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. यासंबंधी त्यांनी विविध कोर्सेसची विस्तृतपणे माहिती दिली
डॉ. विजय लोंढे यांनी महाविद्यालयाने गेल्या दहा वर्षापासून यासंदर्भातील कार्यशाळांचे सातत्याने आयोजन करुन विद्यार्थ्यांना चित्रपट क्षेत्राकडे वळविले असल्याचे सांगितले. त्यातून अनेक विद्यार्थी तयार झाले आहेत. आमचे महाविद्यालय संस्थेचे चेअरमन अमरसिंहबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच या संबंधीचे नवीन कोर्स सुरु करणार आहे. दृकश्राव्य माध्यमातील अनेक नवीन संधी विद्यार्थ्यांना प्राप्त करुन देणार आहोत. त्यासंबंधीचे सेंटर सुरु करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. विजय शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ.दीपक राजमाने, डॉ. संजय सपकाळ,प्रा.शंकर पवार, प्रा.अमोल मोरे, प्रा.अर्चना राक्षे, अविनाश बाड, प्रा.कुलदीप चव्हाण, विजय देवकर, नरेंद्र दीक्षित, डी.जे.माने, सिकंदर मुल्ला, चंद्रकांत बरकडे, नवनाथ जाधव, राजू पवार, गणेश लिंगे तसेच विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise