मांडवे गावात संत गाडगेबाबा विभागीय समितीचे जल्लोषात स्वागत. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 23, 2019

मांडवे गावात संत गाडगेबाबा विभागीय समितीचे जल्लोषात स्वागत.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस तालुक्यातील मांडवे गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले असून त्यांची निवड विभागासाठी झाली होती. त्यामुळे विभागस्तरीय निवड समितीने मांडवे गावाला भेट देवून गावाची पाहणी केली. गावामध्ये प्रवेश करताच त्यांच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी ढोल ताशा बरोबर लेझीम खेळत गावांमध्ये स्वागत केले. विभागीय उपायुक्त राजाराम झेंडे मांडवे गाव म्हणजे स्वच्छतेची पंढरी आहे. असे गौरव उद्गार त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी गावाच्या मेन रस्त्याने कमान, रांगोळी, पाणी मारून सर्व शासकीय कार्यालय चकाचक केली गेल्याचे पाहण्यास मिळाले. यावेळी गावकऱ्याच्या वतीने आलेल्या पाहुण्याचे सत्कार करण्यात आले.
 या विभागस्तरीय कमिटी मधील विभागीय उपआयुक्त राजाराम झेंडे, श्री. भांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, श्री. बोंबले अधिक्षक पुणे विभाग पुणे, श्री. चांदगुडे तसेच त्यांच्या बरोबर गटविकास अधिकारी स्मिता पाटील, विस्तार अधिकारी के.व्ही. खरात, श्री. भोंडवे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोसले, तलाठी पी.जी. उदगावे, सरपंच मनीषा कुमार पाटील, तानाजी पालवे, सदस्य ज्ञानदेव पाटील, शिवाजी पालवे, रामदास कर्णे, शितल दुधाळ, राहुल दुधाळ, अर्जुन दुधाळ, दिपक माने-देशमुख, पोलिस पाटील नितीन सोनट्टके, अरविंद भोसले, शिवाजी गोरे उपस्थित होते.
विभागस्तरीय कमिटीला व्हिडिओ रेकॉर्डिंग द्वारे गावची झालेली प्रगती दाखवण्यात आली. त्या नंतर कमिटीने दप्तर तपासणी करून प्रत्यक्ष पाहणी केली. या कमिटीच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन, जलसंधारण, गटार व्यवस्थापन त्याच बरोबर कचरा व्यवस्थापन याबाबी प्रामुख्याने पाहिल्या जाणार आहेत. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सरपंच मनीषा पाटील यांनी केले. तर सुत्र संचालन प्रशात सरोडकर यांनी केले.
मोफत पिठाची गिरणी, नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी, वापरासाठी मुबलक पाणी, प्रत्येक घर तेथे शौचालय, शुद्ध हवा मिळण्यासाठी मोकळ्या जागी वृक्ष लागवड, मोकळे वाहत असणारे पाणी आडवून छोटे छोटे पाझर तलाव तयार करणे, टाकावू कचऱ्यापासून गांडूळ खत निर्माण. ही समाजोपयोगी कामे करणे सर्वच सरपंचाचे कर्तव्य असते. माझ्या कार्य काळामध्ये सर्वांच्या सहकार्याने ही काम होते आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या कामात सर्व लोकांबरोबर सर्व अधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच यांचे योगदान मोठे आहे.
    सरपंच
मनीषा कुमार पाटील

No comments:

Post a Comment

Advertise