विज्ञान प्रदर्शनात गो.दे. प्रशाला प्रथम. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 23, 2019

विज्ञान प्रदर्शनात गो.दे. प्रशाला प्रथम.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/प्रतिनिधी : 21 डिसेंबर रोजी रणजितसिंह मोहिते पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज जाधववाडी ता. माळशिरस येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शास्त्र वस्तू प्रदर्शनात माळशिरस येथील गोपाळराव देव प्रशाला व ज.चं. आगाशे कनिष्ठ महाविद्यालयातील  12 वी शास्त्रमधील जीवन शिंदे व सचिन माने या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या 'गोमुत्रापासून विद्युत निर्मिती' या विज्ञान उपकरणाचा नववी ते बारावी गटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला असून सदर उपकरणाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये गोपाळराव देव प्रशालेतील इयत्ता नववी ते बारावीच्या गटात 15 विज्ञान उपकरणांचा तर पाचवी ते आठवी गटात 5 विज्ञान उपकरणांचा सहभाग होता. बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी गट शिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, महालिंग नकाते, नातेपुते येथील प्राचार्य डॉ. बी. जी. कोळेकर, संस्थापक शिवाजी जाधव, मुख्याध्यापक घार्गे व इतर शिक्षक उपस्थित होते.
गोपाळराव देव प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत पंचवाघ, जनरल सेक्रेटरी अॅड. मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य आर.एस.ढाले, उपमुख्याध्यापिका  ज्योती केसकर, पर्यवेक्षक सदानंद बडवे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक नवनाथ सुळ यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise