आकाश पुजारी यांना राज्यस्तरीय यशवंतरत्न समाज भूषण पुरस्कार जाहीर. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 20, 2019

आकाश पुजारी यांना राज्यस्तरीय यशवंतरत्न समाज भूषण पुरस्कार जाहीर.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
मंगळवेढा/प्रतिनिधी
अरळी ता.मंगळवेढा येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश पुजारी यांची बीड येथील धनगर समाज युवा मल्हार सेनेकडून धनगर समाजातील मानाचा समजला जाणारा यशवंत रत्न पुरस्कार करीता नुकतीच निवड समिती कडून निवड झाल्याचे जाहीर केले आहे. हा पुरस्कार महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आले आहे.
   पत्रकार,लेखक,समाज सेवक,माहिती अधिकार कार्यकर्ता आकाश पुजारी यांना त्यांच्या सामाजिक,साहित्यिक,पत्रकारिता या विविधांगी क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबदल बीडच्या धनगर समाज युवा मल्हार सेना यांच्याकडून यशवंत रत्न समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
    लवकरच बीड येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळ्यात आकाश पुजारी यांना यशवंत रत्न समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात यईल,असे निवड समितीने कळविले आहे.आकाश पुजारी यांचा या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Advertise