ट्रॅक्टरखाली चिरडून चालकाचा मृत्यू. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 19, 2019

ट्रॅक्टरखाली चिरडून चालकाचा मृत्यू.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : शेतात मशागतीसाठी नेलेल्या ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात महादू लक्ष्मण घोडके (वय - ४०, रा. बोरामणी) याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना तुळजापूर तालुक्यातील खडकी शिवारात काल सायंकाळी ५.३० वा.च्या सुमारास घडली. बोरामणी येथील महादू घोडके ट्रॅक्टर घेऊन शेती मशागतीसाठी खडकी शिवारात गेला होता. त्याचा ट्रॅक्टर नागनाथ शंकर हळदे यांच्या शेतात शेजारी पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रॅक्टरखाली चिरडून गंभीररित्या जखमी झाला. त्यास भाऊ भुताळी घोडके याने काल रात्री सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

No comments:

Post a Comment

Advertise