अज्ञात चोरट्याने पळविली पर्स. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 19, 2019

अज्ञात चोरट्याने पळविली पर्स.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : कोणीतरी अज्ञात चोरट्याने हातातील असलेली पर्ससह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी रेषा सत्यवान पाटील (वय-३३) रा. भांबेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांनी त्यांच्या बंदमध्ये ठेवलेली हातातील पर्स मधील व व 3 हजार 900 रुपये रोख रक्कम हँड पर्स सह कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना १८ डिसेंबर रोजी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास यशोधरा हॉस्पिटल येथे घडली. याबाबत आत्या चोरट्याविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक म्हेत्रे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise