गोळेगाव येथे के बी शेख यांचे व्याख्यान संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 20, 2019

गोळेगाव येथे के बी शेख यांचे व्याख्यान संपन्न.

अहमदनगर  प्रतिनिधी 
 विजय वाठोरे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व आबासाहेब काकडे कला व विज्ञान महाविद्यालय,बोधेगाव आणि आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी. फार्मसी, बोधेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर मौजे गोळेगाव, ता.शेवगाव, जिल्हा अहमदनगर येथे दि.१८/१२/१९ ते दि.२४/१२/१९ या कालावधीत आयोजित केलेले आहे. नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव मा. श्री. अँड विद्याधरजी काकडे  साहेब यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले असून मा.श्री.भास्करराव पेरे पाटील (राष्ट्रीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त) व  जिल्हा परिषद सदस्या मा.सौ.हर्षदाताई काकडे यांच्या व्याख्यानाने समारोप होणार आहे.
          शिबिरात विद्यापीठ नियमानुसार विविध कार्यक्रम/उपक्रम राबविण्यात येत असून मंडल कृषीअधिकारी मा.सुभाष भराट यांचे विषमुक्त शेती या विषयावर व्याख्यान झाले. श्री के बी  शेख यांचे शिक्षण ही समाज सेवेची गुरुकिल्ली या विषयावर व्याख्यान दिले.त्यात ते म्हणाले की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.शिक्षणातच समाज सुधारण्याची ताकत आहे.शिक्षण हे अज्ञानी माणसाला ज्ञानी बनवते.वाईट चाली,रीती,रूढी परंपरेत खितपत पडलेल्या समाजाला जर कोणी तारू शकेल तर ते फक्त आणि फक्त शिक्षण आहे.शिक्षणाने माणूस संस्कारक्षम होतो.शिक्षणातून जेवढी समाजसेवा होते तेवढी समाजसेवा इतर कोणत्याही क्षेत्रातून होणे शक्य नाही.त्यामुळे शिक्षण हे समाज सेवेची गुरुकिल्ली आहे.असे प्रतिपादन व्याख्याते के बी शेख यांनी यावेळी केले.
               त्यानंतर श्री गजानन लोंढे यांचे रा.से.योजनेतील स्वयंसेवकाची भुमिका, श्री भागवत राशिनकर यांचे ग्रामीण पर्यावरण काल आणि आज, प्रा.रविंद्र गोल्हार यांचे हागणदारी मुक्त गाव या विषयांवर व्याख्याने व जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमास आबासाहेब काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.एम.के.फसले व आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस.आर. पट्टन तसेच सर्व राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे नियोजन गावचे सरपंच विजय साळवे, उपसरपंच मुक्ताताई आंधळे ,ग्रामस्थ, कार्यक्रम अधिकारी प्रा.संदिप पालवे प्रा.दिलीप ठोंबे प्रा.महादेव मुंढे प्रा.प्राजक्ता भस्मे  प्रा.मोहिनी खेडकर हे उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Advertise