विभागीय शालेय युनिफाईट स्पर्धेमध्ये यश. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 5, 2019

विभागीय शालेय युनिफाईट स्पर्धेमध्ये यश.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आटपाडी संचलित, श्रीराम ज्युनिअर कॉलेज आटपाडी मधील विद्यार्थी कु.प्रथमेष प्रफ्फुल भिंगे यांने आदर्श विद्यानिकेतन मिणचे ता.हातकणगंले जि.कोल्हापूर येथे ३ रोजी पार पडलेल्या विभागीय शालेय युनिफाईट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले. व त्याची पुणे येथे मेरी मेमोरियल हायस्कूल पाटस, पुणे येथे  होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय युनिफाईट स्पर्धेमध्ये निवड झाली आहे.
या यशाबदद्ल संस्थेचे अध्यक्ष तानाजीराव पाटील व सचिव शिवाजीराव पाटील, यांनी अभिनंदन केले तर प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.आप्पा हातेकर, प्रा.डॉ. सुधाकर भोसले, अमोल भंडारे, नागेश कुंभार, मारूती हेगडे,हर्षवर्धन  सागर व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise