कविता यादव "महात्मा फुले समाजरत्न" पुरस्काराने सन्मानित. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 5, 2019

कविता यादव "महात्मा फुले समाजरत्न" पुरस्काराने सन्मानित.

माणदेश एक्सप्रेस न्युज  
आटपाडी/प्रतिनिधी :  महात्मा फुले   स्मृतिदिना निमित्त श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या वर्षीचा महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार दिघंची गावच्या कु.कविता महादेव यादव यांना देण्यात आला. कविता यादव यांचे शिक्षण  M.Sc. B.ed झाले आहे. उच्चशिक्षित तरुणीस महात्मा फुले स्मृतिदिनी पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट निवेदिका या कला क्षेत्रात हा पुरस्कार देण्यात आला. 
कविता यादव या सध्या इंद्रभाग्य कला व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणुन काम करत आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यास संत सावतामाळी युवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागिय अध्यक्ष अजिंक्य राजेंद्र फुले, संत सावतामाळी युवक संघ सोलापुर जिल्हा अध्यक्ष श्री. दुधाळ तसेच मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरुप श्री संत सावतामाळी युवक संघाचे सन्मानपत्र सोबत सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले. दिघंची गाव आणि आटपाडी तालुक्यातुन त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Advertise