शेळी व मांसल कुक्कुट पक्षी गट वाटप लाभार्थी निवडीसाठी अर्जदारांनी ६ डिसेंबरला उपस्थित रहावे ; जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय धकाते. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 3, 2019

शेळी व मांसल कुक्कुट पक्षी गट वाटप लाभार्थी निवडीसाठी अर्जदारांनी ६ डिसेंबरला उपस्थित रहावे ; जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय धकाते.माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : सन २०१९-२० मध्ये सांगली जिल्ह्यात राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना म्हणून १० + १ शेळी गट वाटप व १००० मांसल कुक्कुट पक्षी गट वाटप या दोन योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती गठीत केली आहे. लाभार्थींची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दि. ६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता सभेची वेळ दिली आहे. ज्या लाभार्थींनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत त्यांनी दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त मिरज डॉ. संजय धकाते यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise