खेडेगावातील विवाह सोहळे हायटेक; गोरज मुहूर्त नवीन क्रेझ. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 3, 2019

खेडेगावातील विवाह सोहळे हायटेक; गोरज मुहूर्त नवीन क्रेझ.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/बिपीन देशपांडे : लग्न म्हणजे वधू-वरांच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण. विवाह सोहळा प्रत्येक कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण असून त्यामध्ये दोन कुटुंब जोडली जातात. दोन मने एक होतात. हा सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी खर्च मोठा केला जातो. आता खेडेगावातली विवाह हायटेक होऊ लागलेत. पुर्वीच्याकाळी विवाह पालकांच्या घरी अंगणात वाड्यात संपन्न होतं असंत. काळानुसार घराचे अंगण संस्कृती विवाह सोहळे आता कात टाकत आहेत, त्याचे स्वरूप बदलत आहेत. ग्रामीण भागात शहराचे अनुकरण केले जात आहे. लग्न झालेल्या काही परंपरा नव्याने पुढे येत असल्याचे चित्र आहे. रात्रीच्या विवाहाची अर्थातच गोरज मुहूर्त ची नवी क्रेझ आली आहे. गोरज मुहूर्त म्हणजे संध्याकाळची वेळ. या गोरज मुहूर्तावर विवाह होत आहे. रात्रीच्यावेळी विजेच्या दिव्यांच्या रोषणाईत विवाह लावले जात आहेत. म्हणतात ना हौसेला मोल नसते. या गोरज मुहूर्तच्या लग्नाच्या वेळी वर वधूकडील पाहुणे हा लग्नसोहळा जास्तीत जास्त कसा रंगतदार होईल याकडे लक्ष दिले जात आहे. त्यातूनच भोजनावळी, वाढपी, केटर्सना पसंती दिली जात असून पत्रिका, फोटोसेश,न व्हिडिओ शूटिंग इत्यादी प्रत्येक गोष्टीवर वारेमाप खर्च केला जात आहे. साखरपुडा, हळद, लग्न ते लागे पर्यंत सर्वच कार्यक्रमाचे चित्रण केले जात असून अनेक सोयी सुविधा एकाच छताखाली मिळू लागल्या आहेत. पैसे जास्त मोजावे लागत असले तरी गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा आनंददायी होत असून फटाक्यांची आतषबाजी, रोशनाईची झगमगाट, बँडच्या तालावर नाचणारे तरुण-तरुणी असा हा नयनरम्य सोहळा वधुवर पक्षाकडील दोन्ही कुटुंब आपल्या डोळ्यात सदैव साठवून ठेवतात.

No comments:

Post a Comment

Advertise