सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना लाभार्थी निवडीसाठी १० डिसेंबरला सभा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 6, 2019

सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना लाभार्थी निवडीसाठी १० डिसेंबरला सभा.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : राज्यातील ३०२ तालुक्यामध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे या योजनेसाठी जिल्हास्तरीय समितीने योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्राधान्यक्रमाने सन 2019-20 करीता मिरज, तासगाव व खानापूर या तीन तालुक्यांची निवड केली आहे. प्रति तालुका १ लाभधारक जिल्हास्तरीय समितीमार्फत निवडला जाणार आहे. मिरज, तासगाव व खानापूर तालुक्यातील ज्या लाभार्थीनी या योजनेकरिता अर्ज सादर केले आहेत त्यांनी दि. १० डिसेंबर २०१९ रोजी दुपारी १ वाजता लाभार्थी निवड सभेस जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, मिरज येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय धकाते यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise