अन्न व्यवसायिकांनी परवाना किंवा नोंदणी घेतल्याशिवाय व्यवसाय करू नये ; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 6, 2019

अन्न व्यवसायिकांनी परवाना किंवा नोंदणी घेतल्याशिवाय व्यवसाय करू नये ; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : अन्न पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या आस्थापनांनी नोंदणी, परवाना असणाऱ्या संस्थांनाच अन्नपदार्थांची विक्री करावी. या नियमांचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत परवाना अट क्र. 14 नुसार कारवाई करण्यात येईल. ज्या अन्न पदार्थांच्या उत्पादकांनी वार्षिक, सहामाही विवरणपत्र अद्याप सादर केले नाही त्यांनी दंडासहित सादर करावे. विलंबाने सादर करणाऱ्या आस्थापनांना प्रतिदिन 100 रूपये प्रमाणे दंड आकारण्यात येईल. सर्व अन्न व्यवसायिकांनी परवाना किंवा नोंदणी घेतल्याशिवाय अन्न पदार्थांचा व्यवसाय करू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अधिकारी यांनी दिनांक 4 डिसेंबर 2019 रोजी जत येथील मे. ज्योर्तिलिंग सहकारी दुध उत्पादक संस्था बनाळी या पेढीची तपासणी करून गाय व म्हैस दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या पेढीने सहामाही विवरण पत्र न भरल्याने त्यांना १८ हजार ८०० रूपये दंड आकारण्यात आला आहे. मे. भाग्यश्री किराणा स्टोअर्स, वार्ड नं. ४, निगडी कॉर्नर जत या पेढीची तपासणी करून पामोलिन तेलाचा १ नमुना तपासणीसाठी घेण्यात आला आहे. मे. धानेश्वरी किराणा स्टोअर्स, निगडी कॉर्नर जत या पेढीची तपासणी करून वनस्पती व शेंगदाणा तेल यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. शशिकांत बाबासाहेब यादव मिल्क कलेक्शन सेंटर वायफळ यांचे वाहन क्र. एमएच १० झेड ७९२९ ची तपासणी करून गाय दुध हा अन्न नमुना तपासणीसाठी घेण्यात आला आहे. तसेच दिगंबर बोराडे शेतकरी सहकारी दुध उत्पादक संस्था मर्यादित शेगाव, धनराज दुध संकलन केंद्र वाहन क्र. एमएच १० एल १८८२ ता. जत या पेढ्यांची तपासणी करण्यात आली आहे. अन्न नमुन्यांचे प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांच्या समवेत अन्न सुरक्षा अधिकारी द. ह. कोळी, एस. एस. हाके व नमुना सहायक तानाजी कवळे यांनी केली.

No comments:

Post a Comment

Advertise