आरसेटी मार्फत नांद्रे येथील महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 6, 2019

आरसेटी मार्फत नांद्रे येथील महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मिरज तालुक्यातील नांद्रे गावातील बचत गटातील महिलांनी अर्ज सादर केले होते. त्या अनुषंगाने जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, पंचायत समिती मिरज व बँक ऑफ इंडिया स्टार सांगली आरसेटी मार्फत पापड, लोणचे व मसाला पावडर तयार करण्याच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन अग्रणी जिल्हा प्रबंधक आर. पी. यादव, आरसेटी संचालक एन. एम. पठाण, आर्थिक साक्षरता केंद्राचे एल. व्ही. कट्टी, समुह संघटक सुकेशनी जाधव, वैशाली पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
यावेळी मान्यवरांनी अशा प्रकारच्या कौशल्य आधारित प्रशिक्षणातून आर्थिकरित्या स्वयंपूर्ण व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करून प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.  सध्या बाजारपेठेतील खाद्य पदार्थांची मागणी पाहता या व्यावसायिक प्रशिक्षणाचा फायदा महिलांना निश्चित होऊ शकतो. या प्रशिक्षणात मुख्य विषयासोबत व्यक्तीमत्व विकास, व्यावसायिक गुणवत्ता, व्यावसायिक संवाद कौशल्य, विविध शासकीय योजनांची माहिती, बँकींग व्यवहार इत्यादीबाबत प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थींसाठी अल्पोपहार, चहा, भोजन इत्यादी सोयी विनामुल्य करण्यात आल्या असल्याचे आरसेटी संचालक एन. एम. पठाण यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Advertise