Type Here to Get Search Results !

स्वेरीत झालेल्या ‘टेक्नोसोसायटल– २०१८’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमधील शोधनिबंधांचे स्प्रिंगरमध्ये प्रकाशन.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
पंढरपूर प्रतिंनिधी :  स्प्रिंगर नेचर स्वित्झर्लंड या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकाशना अंतर्गत गेल्या वर्षी झालेल्या ‘टेक्नोसोसायटल– २०१८’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमधील शोधनिबंध प्रकाशित झाले असल्याची माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट पंढरपुरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी दिली.  दि. १४ व १५ डिसेंबर २०१८ रोजी स्वेरीमध्ये पार पडलेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन  भारताच्या पहिल्या लाईट कॉम्बॅट एअरक्राप्ट या विमानाचे  मुख्य डिझाईनर पद्मश्री डॉ. कोटा हरीनारायण यांच्या हस्ते झाले होते.  तसेच या परिषदेला सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालीनी फडणवीस, बल्गेरियातील सोफिया विद्यापीठाचे डॉ. झ्लात्का व्हाजारनिस व डॉ. मारिया नेनोवा, इस्त्राईलमधील मुक्त विद्यापीठाचे डॅना हरारी, अमेरिकेतील साऊथ डीकोटा विद्यापीठाचे डॉ. संतोष के.सी., पिठाडीया फौंडेशनचे चेअरमन दिलीप पिठाडीया व टेक्सास ए. अँण्ड एम. विद्यापीठाचे टिस सेंटरचे डायरेक्टर डॉ. सतीश बुक्कापटणम, जर्मनीचे भारतातील इंडो-जर्मन कन्सल्टंट अरमीन हक, बेंगलोरमधील आय.आय. एस. सी. चे डॉ. के. राजन्ना व प्रा. जे.एम. चंदरकिशन, बी.ए.आर.सी.चे हेमंत सोड्डे, डॉ. गुलशन रेलहान, डॉ. आर. बालसुब्रमण्यम व  रमांकात रात, महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे डॉ. अजित पाटणकर व डॉ. व्ही.व्ही. महाजनी, डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, पुणेमधील डॉ. दिनेश सिंग ठाकूर, आय.आय. टी. मुंबईचे डॉ. वरदराज बापट, इंडस्ट्रीयल एक्स्पर्ट बी.एच. श्रीनाथ हे ही मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले होते. या परिषदेमध्ये एकूण २७० शोध निबंधांचे सादरीकरण झाले होते.  या सादरीकरणातील निवडक शोध निबंधांचे स्प्रिंगर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकाशकांकडून पुस्तक रुपात प्रकाशन करण्यात आलेले आहे. सदरचे प्रकाशन हे ‘टेक्नोसोसायटल–२०१८’ च्या अंतर्गत ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द  सेकंड इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन अॅडव्हान्सड् टेक्नोलॉजीज फॉर सोसायटल अॅप्लिकेशन्स’ च्या  दोन भागात प्रकाशित झाले आहे. भाग एक मध्ये एकूण ९७ शोध निबंध असून भाग दोन मध्ये ९८ शोधनिबंध आहेत. 
या परिषदेमध्ये परदेशातील १३ हून अधिक शोध निबंधांचा सहभाग होता. त्यामध्ये उजबेकीस्थान, कोरिया, युएसए, बल्गेरिया इ. देशांचा समावेश होता. प्रत्येक शोधनिबंध प्रकरणास वेगळा डी.ओ.आय. (डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटीफायर) नंबर आहे. स्प्रिंगर नेचर स्वित्झर्लंड हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकाशन असून यामध्ये देश-विदेशातील महत्वपूर्ण आणि निवडक शोधनिबंध प्रकाशित केले जातात. भाभा अणुसंशोधन केंद्राचे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. बालसुब्रमण्यम, श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पंढरपुरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनिअरींगच्या डॉ. सुधा आपटे यांनी ही पुस्तके संपादित केलेली आहेत. यापूर्वी २०१६ मध्ये झालेल्या ‘टेक्नोसोसायटल –२०१६’ या परिषदेतील शोधनिबंध सुद्धा याच प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहेत. त्या संग्रहातील शोधनिबंध छपन्न हजाराहून जास्त वेळा डाऊनलोड करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही पुस्तिका स्प्रिंगरच्या मागील वर्षाच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह परसेंटमध्ये गणण्यात आली होती. त्यामुळे आता संशोधनाला आणखी गती मिळणार आहे. स्वेरीमध्ये मागील वर्षी झालेल्या ‘टेक्नोसोसायटल–२०१८’ या आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेमध्ये भारतातून व भारताबाहेरून अनेक संशोधक, शास्त्रज्ञ आले होते. ही परिषद संशोधकांना सामाजिक जाणीवेतून तंत्रज्ञान निर्माण करून, तंत्रज्ञानातून सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरली. या आंतरराष्ट्रीय परिषदेस भारत सरकारच्या बी.आर.एन.एस., डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँण्ड टेक्नोलॉजी तसेच ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन या संस्थांकडून संशोधन अनुदान प्राप्त झाले होते. हे पुस्तक प्रकाशित होण्यासाठी स्वेरीचे प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी, इंटरनल क्वॉलिटी  अॅशुरन्स सेलचे समन्वयक डॉ. संदीप वांगीकर, डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांच्यासह इतर प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. हे शोधनिबंध पुस्तक रूपाने प्रकाशित झाल्यामुळे श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट पंढरपुरचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर.बी. रिसवडकर, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies