कन्या प्रशालेच्या शैक्षणिक सहलीत विविध पर्यटनस्थळांना भेटी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 17, 2019

कन्या प्रशालेच्या शैक्षणिक सहलीत विविध पर्यटनस्थळांना भेटी.
माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सांगोला/प्रतिनिधी : सांगोला येथील माध्यमिक कन्या प्रशालेची सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील नुकतीच उत्साही वातावरणात संपन्न झाली. कन्या प्रशालेची शैक्षणिक सहल कोल्हापूर व कोलपूर परिसर दर्शन काढण्यात आलेली होती. यामध्ये कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा गड, शाहू पॅलेस, रंकाळा व कणेरी मठ आदि कोल्हापूर परिसरातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्या आल्या. 
प्रशालेतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक , भौगोलिक माहिती तसेच पर्यावरणविषयी जागृती होण्याकरिता सदर सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णप्रभा घोरपडे, सुवर्णाताई इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित केलेली शैक्षणिक सहल यशस्वीरित्या पुर्ण करण्यासाठी अर्चना राऊत मॅडम,विठ्ठलपंत शिंदे , संतोष कुंभार सर, सत्यप्रिया देशमुख यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Advertise