Type Here to Get Search Results !

५० व्या वार्षिक सर्व साधरण सभेत कार्यकारिणी कडून राष्ट्रीय गीताचा अवमान : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वार्षिक सर्व साधारण सभेत गदारोळ.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
कोल्हापूर प्रतिनिधी 
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ची ५० वी वार्षिक सर्व साधरण सभा दिनांक १५ डिसेंबर रोजी सकाळी ठिक ११ वाजता होणार होती ती ११: ४५ या अवेळी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी महामंडळाची प्रस्तावना मांडली. नेहमीप्रमाणे अंमलात न आणल्या जाणाऱ्या कार्याचा आढावा घेण्यात आला.आणि लगेचच १२:४५ वाजता सभासदांना जेवणासाठी आवाहनही करण्यांत आले. जे सभासद मुंबई , नाशिक , पुणे , संपुर्ण महाराष्ट्रातुन केवळ सभेसाठी आणि आपले महत्वाचे प्रश्न जे अद्यापही मार्गी लागले नाहीत त्यांवर काही निर्णायक तोडगा काढावा यासाठी आलेले होते तेव्हा त्यांचा विचार न करता कार्यकारीणीला जेवणामध्ये स्वारस्य कसे काय वाटते...?   माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांचे सभासदत्व रद्द करावे या मागणीसह वार्षिक अहवालच मान्य नसल्याचे सांगत सभासदांनी अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कार्यवाह सुशांत शेलार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून 
सभासदांच्या समस्या काय आहेत हे न जाणता कार्यकारिणी मंडळ सभा कशी काय बरखास्त करू शकते..?  आणि सर्वात मोठी लांच्छनास्पद गोष्ट म्हणजे या सभेत कार्यकारिणी ने  " जन गण मन " हे आपले राष्ट्रगीत या राष्ट्र गीताचा भर वार्षिक सभेत अवमान करून आपल्या भारतमातेचा अपमान केला असून हे सभेत उपस्थित असलेल्या सभासदांनी निदर्शनास आणून देखील पोलिस मात्र बघ्यांची भूमिका घेत होते. तेव्हा या कार्यकारिणी वर ताबडतोब देशद्रोही खटला करावा आणि त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यांत आली असून कार्यकारिणीच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उपस्थित सभासदांकडून उमटल्या गेल्या आहेत. आपण सभेचा अवमान करत आहोत पण सभासदांच्या समस्यांचे निवारण मात्र नाही करू शकत,  असे निदर्शनास येताच दुपारच्या भोजनाचे कारण पुढे करून सभा आटोपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला पण चोखंदळ सभासद आणि संचालक रणजित (बाळा) जाधव यांनी अध्यक्ष आणि कार्यवाह यांना वगळून उपस्थित संचालक सतीश बिडकर , सतीश रणदिवे , पितांबर काळे, अन्य संचालक मंडळ तसेच माजी अध्यक्ष विजय पाटकर यांना विश्वासात घेऊन संचालिका वर्षा उसगावकर यांच्या अध्यक्षतेखाली त्याच ठिकाणी समांतर सभा आयोजीत करून चुकीच्या अहवाल संबंधी निषेध व्यक्त केला त्याचबरोबर महामंडळाच्या जागे संदर्भात कार्यकारिणी कालखंडात जो काही भ्रष्टाचार झाला आहे तो खपवून घेणार नाही असेही या ठिकाणी एकमताने ठरविण्यात आले. सभासदांच्या ज्या काही समस्या ,अडचणी आहेत त्या लवकरच मार्गी लावल्या जातील अशा विश्वास या समांतर सभेत सभासदांना देऊन  यशस्वीपणे या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता केली.
आमच्या दैनिक माणदेश एक्सप्रेस whats App ग्रुप मध्ये Join होण्यासाठी Click करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies