युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावर उतरणार कृतिका गायकवाड, - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 17, 2019

युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावर उतरणार कृतिका गायकवाड,



  
माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : बंदिशाळा या चित्रपटात जिने ठसकेबाज लावणी सादर केली, ती नृत्यांगना 'कृतिका गायकवाड' आता 'झी युवा' वाहिनीवरील 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावर आपल्या नृत्याचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्याशी याविषयी गप्पा मारल्या असता, ती म्हणाली, 'तू ही रे' चित्रपटातील, 'गुलाबाची कळी' या गाण्यावर मी माझा पहिला परफॉर्मन्स देणार आहे. 'बॉलीवूड स्टाईल'ने हे सादरीकरण मी करणार आहे. ही माझी आवडती शैली आहे, आणि त्यामुळेच मला डान्स करणे सोपे सुद्धा जाईल. बंदिशाला सिनेमातील वैशाली आणि अमितराजच्या एका गाण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याच गाण्यावर पहिला परफॉर्मन्स असल्याचा मला खूप आनंद किंवा काही विशिष्ट भावना मनात आहे. पुन्हा नृत्याच्या मंचावर येण्याची आतुरता विविध चित्रपटांमध्ये मी अनेक गाण्यांवर शूट केलेलं आहे. फुलवा खामकरने कोरिओग्राफ केलेल्या एका गाण्यात मी मयुरेश पेमसोबत सुद्धा काम केलेलं आहे. अर्थात, चित्रपटातील गाण्याचं चित्रीकरण व प्रेक्षकांची उपस्थिती असताना करण्यात येणारा परफॉर्मन्स यात खूपच फरक असतो. मंचावर, लाईव्ह परफॉर्मन्स करण्याचा माझा अनुभव मात्र बराच आधी घेतलेला आहे. माझ्यात अधिकाधिक सुधारणा व्हावी असा माझा प्रयत्न असेल.

No comments:

Post a Comment

Advertise