राधिका स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 26, 2019

राधिका स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस प्रतिनिधी संजय हुलगे : श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस याठिकाणी राधिका स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा.खा.विजयसिंह मोहिते - पाटील, संस्थाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले . तसेच प्राचार्य. योगेश गुजरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करुन सर्व मान्यवरांचे स्वागत केले.वार्षिक विविध गुणदर्शन अंतर्गत राधिका स्नेहसंमेलन या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे नृत्याविष्कार सादर करण्यात आले.यामध्ये नर्सरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यामध्ये विविध प्रकारच्या मराठी, हिंदी, लावणी, रिमिक्स, गोंधळ, गौळण अशा ३३ गीतांचा, तर ३ नाटकांचा समावेश होता.यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, देशभक्तीपर, समाज प्रबोधनपर, गीते तसेच नाटकांचाही समावेश होता.रविवार माझ्या आवडीचा, मोरया-मोरया, संदेसे आते है, पापा मेरे पापा, राधे ग राधे या गीताने वन्स मोअर मिळवला.तर वृध्दाश्राम व मले बाजारला जायचं नाही! या नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली.यावेळी महिला पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.आपल्या मुलांच्या अंगातील कलागुणांना पाहून विद्यालय चांगल्या प्रकारे वाव देतो अशाप्रकारे चर्चा होत होत्या.

या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष डॉ.मारुती पाटील, नगरसेविका नूतन वाघमोडे, ताई वावरे, गणपतराव वाघमोडे, लक्ष्मण पवार, बाळासाहेब सरगर, महादेव माने, गौरव गांधी, विजय देशमुख, महेश बोत्रे, निलेश घाडगे, सचिन वावरे, रावसाहेब देशमुख, खलील मुलाणी, ॲड.सत्यजित गलांडे, बबनराव देवकते, अमिर पठाण, हरिभाऊ शिंदे, मच्छिद्र गोरड  प्राचार्य योगेश गुजरे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, परिसरातील बहुसंख्य पालक उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Advertise