Type Here to Get Search Results !

माझ्या शब्दात "शरद पवार" राज्यस्तरीय महाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे आयोजन.



माणदेश एक्सप्रेस न्यूज 
प्रतिनिधी :  माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा शरदचंद्रजी पवार ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. ५२ वर्षे राज्याच्या व देशाच्या कायदेमंडळात कार्य केलेले शरदचंद्रजी पवार हे एकमेव नेते आहेत. पवार साहेबांनी ८० व्या वर्षात पदार्पण केले असले तरी त्यांच्या विषयी जनमानसात कुतुहल आहे. आजच्या तरूणांनी विस्तारलेल्या प्रसारमाध्यमांतून त्यांच्याविषयी खुप जाणून घेतले आहे. तरूणांना पवार साहेबांविषयी काय वाटते, काय भावते, काय अपेक्षित आहे, हे जाणून घ्यावे या उद्देशाने महाविद्यालयीन निबंध स्पर्धा आयोजित करीत आहोत. शरद पवार यांचे फॅन, त्यांचे कट्टर विरोधक आणि त्यांच्याविषयी चिकित्सक मत असणारे असे तीन घटक समाजात आहेत. 
           या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थी आदरणीय पवार साहेबांचे कार्य, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी केलेले लेखन, साहित्य व विचार अभ्यासून त्यांची मते आपल्या शब्दातून मांडू शकतील. जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी.राज्यस्तरीय पारितोषिक ( प्रत्येक विभागाकरिता)प्रथम पारितोषिक:- रूपये १००००/- प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह , व्दितीय पारितोषिक:- ५०००/- प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह , तृतीय पारितोषिक:- ३०००/- प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह ,उत्तेजनार्थ चार पारितोषिके:- प्रत्येकी २०००/- प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल.तसेच प्रत्येक स्पर्धकांस सहभागाचे प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येईल.
           स्पर्धेच्या नियम व अटी पुढील प्रमाणे-ही स्पर्धा मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा या सहा विभागांत घेण्यात येईल.लेख ८०० ते १००० शब्दांचा असाव. विहित शब्दमर्यादेपेक्षा अधिक शब्दांच्या प्रवेशिका विचारात घेतल्या जाणार नाहीत.लेख मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या पैकी कोणत्याही एका भाषेत असावा.लेख स्वहस्ताक्षरातील व सुवाच्च अक्षरात असावा. लेखामध्ये शुद्धलेखनाच्या चुका व खाडाखोड असू नये. लेखासाठी केवळ निळ्या अथवा काळ्या शाईचा वापर करण्यात यावा. लेखासाठी कोरा कागद वापरण्यात यावा, लेख पाठपोट नसावा.लेखासाठी नमुद करण्यात आलेल्या विषयांना अनुसरूनच लिखाण करण्यात यावे, विषयबाह्य लिखानाचा विचार करण्यात येणार नाही.स्पर्धेसाठी एका वाक्यातील विषय देणे आम्ही टाळतो आहोत कारण मा. पवार साहेब गेली ५५ वर्षे समाजकारण, राजकारणात सक्रिय आहेत. या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे दुरगामी परिणाम काय आहेत या अनुषंगाने विश्लेषणांत्मक, चिकित्सक, सटीक लेख अपेक्षित आहेत. लेखासोबत संपूर्ण भरलेला प्रवेश अर्ज असणे बंधन कारक आहे त्याशिवाय प्रवेशिका ग्राह्य धरण्यात येणार नाही.स्पर्धेचा निकाल केवळ विजेत्या स्पर्धकांनाच पत्राद्वारे कळविण्यात येईल.पाठविण्यात आलेल्या प्रवेशिकांमधील लेख प्रसिद्ध/ प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजकांचा असेल. याबाबत स्पर्धकाला कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही. लेखाची तपासणी प्रतिष्ठानच्या वतीने नेमण्यांत आलेल्या तज्ज्ञांच्या निवड समितीव्दारे करण्यात येईल.निकालाबाबत निवड समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहील. स्पर्धेच्या नियम व अटींमधे ऐनवेळी बदल करण्याचा हक्क निवड समितीला असेल. लेख जमा करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल २०२० राहिलं.स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाबाबत विजेत्यांना कळविण्यात येईल.
लेख पाठविण्याचा पत्ता-शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे ११८४/ब ज्ञानेश्वर पादुका चौक,फर्ग्युसन काॅलेज रोड,शिवाजी नगर पुणे ०५ फोनं नं०२०-२५५३६६९९/२५५३६६३३ . असा असून दिलेल्या वेळेतच स्पर्धेसाठी लेख पाठवावेत.
           या स्पर्धेच्या आयोजनासाठी व सर्व संयोजनासाठी लक्ष्मीकांत खाबिया(अध्यक्ष)शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे,नंदकुमार बंड (उपाध्यक्ष)शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे ,संदीप राक्षे (समन्वयक)शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे -८६५७४२१४२१ , विवेक थिटे (प्रसिद्धी प्रमुख)शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे ,लेखक संजय गोराडे (संयोजक) उत्तर महाराष्ट्र विभाग ,डाॅ राजा धर्माधिकारी(संयोजक)विदर्भ विभाग,कवयित्री जया नेरे(संयोजक) उत्तर महाराष्ट्र विभाग,कवयित्री शितल मालुसरे (संयोजक)कोकण, मुंबई विभाग हे श्रम घेत आहेत.
      जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी.असे आवाहन लक्ष्मीकांत खाबिया(अध्यक्ष)शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे,नंदकुमार बंड (उपाध्यक्ष)शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे ,संदीप राक्षे (समन्वयक)शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies