Type Here to Get Search Results !

अँड. प्रज्ञेश सोनावणे यांना राष्ट्रीय भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्कार.



भिवंडी प्रतिनिधी 
मिलिंद जाधव : वर्ल्ड ह्यूमन राईट पिपल्स कौन्सिल, यासंस्थेच्या वतीने देश विदेशातील, विविध क्षेत्रातील मानवी मूलभूत हक्कांसाठी, तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर्षी ठाणे शहरातील अँड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांच्या एकूणच कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
     अँड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे हे ठाणे शहराचे मूळ रहिवासी असून विद्यार्थी दशेपासूनच, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करीत आले आहेत. त्याचबरोबर समाजसेवेतून मानवी मूलभूत हक्कांसाठी सदैव लढा देण्यासाठी अग्रेसर असतात आणि तेव्हापासून ते २० वर्ष अविरहितपणे विविध विषयांवर वर्तमानपत्रात लिखाण करीत आहेत. आतापर्यत त्यांचा सामाजिक व इतर विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच सहभाग असतो. फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा प्रचार प्रसार करून भारतीय संविधान हाच देशाचा सर्वोच ग्रंथ मानून, प्रत्येक भारतीय नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी अँड. सोनावणे मानवाच्या हितासाठी कार्य करीत आहेत.
     आदिवासी ग्रामीण भागात जाऊन शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शाळेचे सामुग्री भेट देत असतात, तसेच विधी क्षेत्रामध्ये हजारों गरीब पिढीत लोकांना आतापर्यंत मोफत कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन केलेले आहेत. विविध साहित्य, कवी संमेलनातून आणि सामाजिक कार्यक्रमातून ते आपल्या कविता, लिखाणाच्या माध्यमातून मानवी हक्कांच्या हितासाठी समाजप्रबोधन करीत असतात. एवढंच नव्हे तर त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे उत्तम कवी, लेखक, वकील, वक्ता, सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आज इतरांच्या नजरेतून पाहायला मिळते. म्हणूनच त्यांच्या अमूल्य कार्याची दखल घेऊन दिनांक २५ डिसेंबर २०१९ रोजी  भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार २०१९ प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली, मुंबई येथे दुपारी ०३:०० वाजता बहरिन राष्ट्रातील WHR चे अध्यक्ष लीलाधर बायकम्पडी  यांच्या हस्ते कवी, लेखक अँड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies