मुला-मुलींवर योग्य संस्कार रुजवणे केवळ शिक्षकांची जबाबदारी नाही तर पालकांचीही तितकीच जबाबदारी :गणेश वाघमोडे. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 14, 2019

मुला-मुलींवर योग्य संस्कार रुजवणे केवळ शिक्षकांची जबाबदारी नाही तर पालकांचीही तितकीच जबाबदारी :गणेश वाघमोडे.

 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/अहमद मुल्ला : अल्पवयीन मुलांनी व त्यांच्या पालकांनी मुला मुलीचे हक्क व कायदे यांचा अभ्यास करणे गरजेचे असुन आपल्या  मुलावर या वयात योग्य संस्कार रुजवणे गरजेचे आहे . एक चुक त्या मुलांचे आयुष्य करियर बाद करते हि चुक करण्यापासुन केवळ शिक्षक थांबवू शकत नाहीत तर पालकांची हि तितकीच जबाबदारी आहे ती पालकांनी वेळीच आपल्या मुलांवर किंवा मुलीवर वेळीच लक्ष न  दिल्यास तो किंवा ती पोलिसी कायद्याच्या कचाट्यात सापडू शकते. त्यासाठी त्यांनी स्वतःचे हक्क कोणते समजुन घेणे महत्वाचे आहे असे मत म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि गणेश वाघमोडे यांनी सिध्दनाथ हायस्कुल व जुनियर कॉलेज येथे व्यक्त केले.
 यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापिका रुक्साना मोकाशी, पर्यवेक्षिका सौ लता शिंदे संतोष देशमुख, सौ.अनुप्रिता डफळे, प्रविन भोते,अहमद मुल्ला विजय भागवत दिलीप माने  आदी उपस्थीत होते

No comments:

Post a Comment

Advertise