सांगोला - वाणीचिंचाळे ग्रामपंचायत सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या नंदाबाई तुकाराम झाडबुके यांची बिनविरोध निवड. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 14, 2019

सांगोला - वाणीचिंचाळे ग्रामपंचायत सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या नंदाबाई तुकाराम झाडबुके यांची बिनविरोध निवड.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
 प्रतिनिधी : वाणीचिंचाळे ग्रामपंचायत निवडणूक आज 13 /12/ 2019 या वर्षासाठी सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे खंदे समर्थक नंदाबाई तुकाराम झाडबुके यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सदर निवडणूक प्रक्रिया बारा ते दोन या वेळेत पार पडली . सदर उमेदवारीसाठी विरोधी बाजूनी कोणीही अर्ज भरला नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही निवडणूक बिनविरोध जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री उगले सर्कल यांनी काम तर साळुंखे ग्रामसेवक यांनीही यास सहकार्य केले.
 सरपंच पदाची निवड जाहीरझाल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण केली.  यावेळी त्यांच्या निवडीबद्दल  मा.आ.गणपतराव देशमुख यांनी अभिनंदन केले तसेच पंचायत समितीच्या सभापती डॉ श्रुतीका लवटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सरपंचाचे अभिनंदन केले.   यावेळी नुतन सरपंचाचा सत्कार ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला. तसेच सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच हनुमान मंदिरात निवडणूक निर्णय अधिकारी व सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी मा सरपंच चिदानंद स्वामी, रामलिंग पाटील, शंकर गडहिरे, बसवंत पाटील, यशवंत जावीर,गणपत गंगाधरे, हणमंत जुजारे, सदाशिव जुजारे, मा उपसरपंच सरस्वती गडहिरे, कैलास गडहिरे, रंजना गडहिरे, रेखा पवार,बापुद्दीन शेख,घनश्याम पवार, बाळासाहेब बनसोडे, संतोष पवार, दादासाहेब घुणे,दिपक स्वामी,दगडु जाधव,पप्पू गडहिरे, पप्पू झाडबुके, सुभाष झाडबुके, महेश गडहिरे, जितेंद्र गडहिरे,महादेव गवळी, सूर्यकांत पाटील, सिद्धेश्वर लंबे,प्रकाश शेख,रफिक शेख,बंडू सोपे यांच्यासह गावातील अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ आदि उपस्थित होते.
   यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सांगोला पोलीस स्टेशनचे पो काँ चंदनशिवे व पठाण यानी चोख बंदोबस्त ठेवला. तसेच पोलीस पाटील प्रशांत गडहिरे, कोतवाल राजु गुजले यांनी सदर प्रक्रियेस मदत केली.

No comments:

Post a Comment

Advertise