Type Here to Get Search Results !

खानापूरच्या विकाससाठी प्रयत्नशील : सुहासनाना शिंदे : रमाई घरकुल लाभार्थींना धनादेशाचे वाटप ; ५८ घरकुल मंजूर ; प्रत्येकी २ लाख ५० हजार मिळणार.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
खानापूर : खानापूर शहरातील प्रलंबित कामाना गती प्राप्त करुन सर्वसामान्य लोकांना आवश्यक असणाऱ्या सर्व  सेवासोई उपलब्ध करुन शहराचा सर्वांगीन विकास कराण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन खानापूर जनता विकास आघाडीचे नेते माजी जि.प. सदस्य सुहासनाना शिंदे यांनी केले. रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थींना पहिला हफ्त्याचा धनादेश प्रत्येकी   १ लाख २५ हजार रु. प्रदान सोहळा त्यांच्या शुभ हस्ते सपन्न झाला. 
नगरपंचायत मार्फत ५८  घरकुल मंजूर झाले आहेत, त्यांना प्रत्येकी दोन लाख पन्नास हजार अनुदान मिळणार आहे. त्याबरोबर ज्यांनी प्रत्यक्ष बांधकाम सुरूवात केले आहे अशा १९ जणांना पहिला धनादेश देण्यात आला असून राहिलेल्यांना लवकरच धनादेश देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष तुषार मंडले होते. तर प्रमुख उपस्थिती उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर, माजी पं.s. समिती सदस्य पांडुरंगतात्या डोंगरे, चेअरमन महेश माने, पोलीस पाटील प्रभुराज पाटील, सभापती सौ. नूतन भरत टिंगरे,  माजी सभापती सौ.मंगल खंडू मंडले,  नगरसेविका सौ.रेखा धनाजी कदम, नगरसेविका सौ.सुरेखा सुभाष डोंगरे, राष्ट्रीय लहू शक्तीचे सरचिटणीस संदिप ठोंबरे,  बबन माने, राजेंद्र टिंगरे, धनाजी कदम,  सतिश भगत तसेच शहरातील प्रमुखमान्यवर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
यावेळी प्रल्हाद कांबळे यांनी प्रभाग क्रमांक ७ व १५ मधील गेल्या अनेक वर्षेपासून होत असलेला अन्याय व आता होत असलेली प्रगती ही निश्चित आपल्या शहरातील विकासकामेच इतर शहरासमोर आदर्श ठरले असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रीय लहुशक्तीचे संघटक संदिप ठोंबरे म्हणाले, खानापूर शहरातील होत असलेली विकासकामे त्याच बरोबर  हे तालुक्याच्या नावाने गाव असल्याने नगरपंचायतीच्या मार्फत पाठपुरावा करुन सुहासनानाच्या मार्गदर्शनखालील शहरात MIDC यावी ही अपेक्षा व्यक्त केली. खानापूर पंचायत समितीचे माजी सदस्य पांडुरंगतात्या डोंगरे यांनी खानापूर नगरपंचायत मार्फत होत असलेल्या कामे सविस्तर सांगून शहरातील सर्व नागरिकांना जास्तीत जास्त नगरपंचायत मार्फत सेवा सुविधा उपलब्ध करुन कोणत्याही राजकीय हेवेदावे न करता फक्त विकास करणे हाच एक कलमी कार्यक्रम आम्ही शहरात राबवत आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी बहुजन सामाजिक संस्थेचे सचिव उमेश धेंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख धेंडे, गौतम मोरे, देवाप्पा कांबळे, दत्तात्रय खाडे, मिलींद धेंडे, अरुण धेंडे, बाळासाहेब धेंडे, संतोष धेंडे, राजेंद्र धेंडे, अमोल धेंडे शक्ती धेंडे, दिपक ठोंबरे,अतुल सावंत सर्वेश मोरे, सतिष त्रिबंके, दयानंद कांबळे, चंद्रकांत ठोंबरे, दंगडू धेंडे, बाबु पाखरे, सर्जैराव ठोंबरे, अशुतोष धेंडे, संतोष कदम, प्रफ्फुल धेंडे, पोपट सकट, साजन धेंडे तसेच यावेळी लाभार्थी व शहरातील नागरिक युवक महिला नगरपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सुशिल लोंढे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies