Type Here to Get Search Results !

ऑनलाइन फसवणुकीचे लोन ग्रामीण भागात सुद्धा व्यवसायिकांची माहिती काढून फसविण्याचे प्रकार ; सतर्क राहिल्यामुळे फसवणूक टळली.

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : ऑनलाइन फसवणुकीचे लोण आता ग्रामीण भागात सुद्धा पोहोचले असून, फोन करून लोकांना येथे बँकेचे खाते नंबर व एटीएम नंबर मागितला जात असल्याने नागरिकांची फसवणूक होत आहे. 
आटपाडी येथील अनंत भोजनालयाचे मालक राजेंद्र कवडे यांची होणारी फसवणूक होताहोता थोडक्यात टळली. आटपाडी येथील श्री. सिद्धनाथ मंदिराजवळ मनोज कवडे यांचे प्रसिद्ध असे अनंत भोजनालय आहे. दि. २८  नोव्हेंबर रोजी त्यांचे बंधू राजेंद्र कवडे यांना मोबाईलवर फोन आला व आम्ही आर्मीचे लोक असून आटपाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कामानिमित्त आलो असल्याने आम्हाला पंधरा जेवणाची ताटे पार्सल पाहिजेत  असे सांगितले. तसेच पेमेंट बाबत व्हाट्सअप नंबर वरती बँक खाते नंबर पाठविण्यास सांगितले.
राजेंद्र कवडे यांना व्हाट्सअप बाबत काही माहिती नसल्याने त्यांनी त्यांचे मित्र चौंडेश्वरी ग्रामीण पतसंस्थेचे व्हा. चेअरमन राहुल सपाटे यांना बोलावून घेतले व त्यांना सदरची घटना सांगून व्हाट्सअप वरती डीटेल पाठवण्यास सांगितले असता त्यांनी संपूर्ण डिटेल्स व्हाट्सअपवर पाठविले.
त्यानंतर थोड्यावेळाने त्यांना पुन्हा फोन आला व आमचे एटीएम कार्ड खराब झाले असून तुमच्या अकाउंट नंबर वरती पैसे पाठवतो असे सांगून एटीएम नंबर वरील मागील व पुढील फोटो काढून व्हाट्सअप वर पाठवण्यास सांगितले असता राहुल सपाटे यांना त्यांची शंका आली. त्यांनी तात्काळ त्यांच्या स्वतःच्या चालू खात्याचे डिटेल्स पाठवले खात्यावर संपूर्ण रक्कम दुसऱ्या खात्यावर त्यांनी ट्रान्सफर केली व एटीएम नंबर वरील मागील व पुढील फोटो काढून पाठविले.
लगेच त्या व्यक्तीचा फोन आला मोबाईल वरती मेसेज आला आहे त्यातील क्रमांक पाठवा असे सांगितले. परंतु राहुल सपाटे यांनी सदरचा मोबाइल बंद असल्याचे सांगितले त्यांनी तत्काळ तुमची ऑर्डर कॅन्सल होऊ शकते असे सांगितले व त्या व्यक्तीने फोन कट केला.
यानंतर राहुल सपाटे यांनी सदर मोबाईल नंबरचे  डिटेल्स लोकेशन तपासले असता सदरचा फोन कॉल हा राजस्थान येथून आल्याचे निष्पन्न झाले व हॉटेल व्यवसायिक राजेंद्र कवडे यांची होणारी फसवणूक राहुल सपाटे यांच्या सतर्कपणामुळे टळली.
सध्या ऑनलाइनच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार मात्र वाढण्याचे प्रकार आता ग्रामीण भागातही पोहचले असून ग्रामीण भागातील लोकांना याबाबतची माहिती नसल्याने लोक अशा घटनांना बळी पडत आहे. लोकांनी सावधानता बाळगून कोणत्याही व्यक्तीला आपली बँक डिटेल पाठवता कामा नये नाहीतर त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
ऑनलाईन पेमेंट करतो असे सांगून बॅंकेचे डिटेल्स घेतले जात आहे. नागरिकांनी आपल्या बँकेचे डिटेल्स देवू नये, सजग रहावे. अन्यथा फसवणूक होऊ होवून मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 राहुल सपाटे 
व्हा, चेअरमन
चौंडेश्वरी ग्रामीण पतसंस्था, आटपाडी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies