ममता हॉस्पिटल व पार्वती मेडिकल यांना पालिकेची नोटीस ; घड्यावर बायोमेडिकल घातक कचरा टाकलेबाबत नगरपरिषदेची कारवाई. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 7, 2019

ममता हॉस्पिटल व पार्वती मेडिकल यांना पालिकेची नोटीस ; घड्यावर बायोमेडिकल घातक कचरा टाकलेबाबत नगरपरिषदेची कारवाई.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
विटा/प्रतिनिधी :  विटा नगरपरिषद हद्दीतील मायणी रोड येथील ममता हॉस्पिटल व पार्वती मेडिकल यांच्या हॉस्पिटल व मेडिकल मधून निघणारा बायोमेडिकल वेस्ट कचरा दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजी उघड्यावर टाकलेले पथकाच्या निदर्शनास आला. त्याबाबतचे पुरावे नगरपरिषदेस उपलब्ध झाले आहेत. सदर कचऱ्याबाबत विचारणा करीत असताना ममता हॉस्पिटल व पार्वती मेडिकलच्या डॉक्टरांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांशी उद्धटपणे वर्तणुक करत सहकार्य केले नाही. सदर बाबींवर खुलासा करण्यासाठी पालिकेने नोटीसाद्वारे २ दिवसाची मुदत दिली आहे. 
नगरपरिषदेने घनकचरा अधिनियम 2016 मधील बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियम 2016 च्या तरतुदीनुसार व महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती व औद्योगिक नागरी 1965 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल  असे नोटीस ममता हॉस्पिटल व पार्वती मेडिकल यांना जारी केले आहे.
सदर बायोमेडिकल वेस्ट कचरा पडलेल्या ठिकाणी नगरपालिकेची टीम व आरोग्य निरीक्षक आनंद सावंत यांनी तात्काळ जाऊन माहिती घेतली असता ममता हॉस्पिटल चे डॉक्टर सत्यजित साळूंखे यांनी सदर प्रकारात आमचा काही संबंध नाही अशी भूमिका घेत उडवाउडवीची उत्तरे दिली.  अनेक पुरावे दाखवून ही सदर डॉक्टरांनी खुद्द नगरपालिका आमच्याकडे इंजेक्शन, सुया आणून टाकत आहे असा हास्यास्पद आरोप केला. नगरपालिका कर्मचारी तसेच नगरपालिकेच्या सर्व टीम सोबत संबंधितांनी उध्दटपणे वर्तणूक केली. अधिनियमानुसार असलेला दंड करण्यास नकार दिला यावेळी विटा नगरपालिकेने बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अधिनियम 2016 नुसार ममता हॉस्पिटल व पार्वती मेडिकल यांना कायदेशीर कारवाई बाबत नोटीस दिली आहे. यावेळी आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत, नितीन चंदनशिवे. राजू पाटील, असलम शेख, रोहीत पवार, केदार जावीर, सुरज मंडले, यांचेसह पालिका कर्मचारी उपस्थित होते.
तर पोलिसात गुन्हा  ममता हॉस्पिटल व पार्वती मेडिकल यांनी बेजबाबदारपणे बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकल्याबद्दल नगरपरिषदेने दोन दिवसाची मुदतीमध्ये सदर प्रकरणाचा खुलासा करावा अशी नोटीस दिली आहे. ममता हॉस्पिटल व पार्वती मेडिकल यांनी सदर प्रकरणाचा दोन दिवसात लेखी खुलास न केल्यास विटा पालिकेच्या वतीने कायदेशीर कारवाई करत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Advertise