दिव्यांगांच्या हस्ते ‘नवे गाव आंदोलन’ विशेषांकाचे प्रकाशन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 7, 2019

दिव्यांगांच्या हस्ते ‘नवे गाव आंदोलन’ विशेषांकाचे प्रकाशन
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : आम्ही अपंग असलो तरी परावलंबी नाही. आम्हीही स्वावलंबी आहोत. आम्हालाही स्वाभिमान आहे. या जोरावर आम्ही आमचे विश्व तयार करु, असा आत्मविश्वास दाखवणार्याी जिगरबाज दिव्यांगाच्या हस्ते “नवे गाव आंदोलन” मासिकाच्या दिव्यांग शक्ती विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
अंध, अपंग, मतीमंदांसाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या सांगलीतील अपंग सेवा केंद्रामधील संचालक आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते या विशेषांकाचे आज प्रकाशन करण्यात आले. आपल्या हस्ते अंकाचे प्रकाशन होत असल्याचा एक वेगळाच आनंद आणि अभिमान निरंजन, सुखदेव, केदार, योगेश या मतिमंद मुलांच्या चेहर्याावर दिसत होता. या अंकामध्ये आपल्यासारखेच अनेक जिगरबाज दिव्यांगांची माहिती पाहून त्यांना कौतूक वाटले. केंद्राच्या अध्यक्षा निर्मला कुलकर्णी यांनी केंद्रातील विविध विभागांची माहिती दिली.
स्वागत कार्यकारी संपादक नंदू गुरव यांनी केले तर आभार प्रा.संजय ठिगळे यांनी मानले. कार्यक्रमास संपादक गौतम पाटील, विजय बक्षी, बी.आर.पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise