महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 7, 2019

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
तासगाव/प्रतिनिधी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्य म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक दुखण्यावर एकमेव औषध असून विद्या मिळवण्यासाठी पुस्तकावर प्रेम करावे लागते तरच विद्या प्रसन्न होते असे सांगितले. संविधानाच्या माध्यमातून देशातील विविध जाती धर्माला एकात्मतेच्या धाग्यात गुंफण्याचे काम या महामानवाने केल्याचे सांगितले.
याप्रसंगी इ. ११ वी  विज्ञान विभागातील धनंजय प्रसाद पाटील, कु.वर्षा अशोक बागणकर, कु.तनुजा विठ्ठल खराडे कु. काजल दिलीप भुईकर, कु.सायली चंद्रकांत गाडे, कु.गीतांजली सर्जेराव खताळ या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले तर आभार कार्यक्रम कमिटी प्रमुख प्रा. आर.बी. मानकर यांनी मानले. कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा.के.एस.पाटील, महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise