एसटी बस व मोटारसायकलची धडक ; दोघे जखमी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 17, 2019

एसटी बस व मोटारसायकलची धडक ; दोघे जखमी.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सोलापूर प्रतिनिधी : कामासाठी निघालेल्या फिर्यादी अश्वजीत अनिल मस्के व अमोल अनंत मस्के यांच्या दुचाकीला एसटीची धडक बसल्याने दोघे जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की हैदराबाद रोड येथील काम काही महत्त्वाच्या कामासाठी फिर्यादी अश्वजीत मस्के ( वय-२४) राहणार घर नं ४१/१ चंडक शाळेच्या समोर न्यू बुधवार पेठ, सोलापूर व फिर्यादीचा भाऊ अमोल आनंद सातपुते असे दोघेजण हिरो कंपनीच्या एचएफ डीलक्स मोटरसायकल क्रमांक एम.एच १३ बीएम ५२६३ वरून मार्केट यार्ड चौकाकडून सर्विस रोडणे धोत्रे कर वस्ती मार्गे घराकडे जाण्याकरिता निघाले होते. त्यावेळी जुना तुळजापूर नाका ब्रिज जवळ ते आले असता मध्यवस्तीत चौकाकडून तुळजापूर कडे जाणारी एसटी बस क्रमांक एम.एच ०४.एन.९७३२ या एसटी बसने फिर्यादीच्या मोटर सायकल इस समोरून धडक दिली. व फिर्यादीच्या डाव्या पायाच्या पोटरी स्व मोटारसायकल चालवणारा फिर्यादीच्या मावस भावाच्या चेहऱ्यावर मार लागला. व ते जखमीही झाले. ही घटना १५ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जुना तुळजापूर नाका ब्रिज जवळ घडली. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून,एसटी चालक प्रवीण दगडू नाळे मुक्काम पोस्ट मुरुर, जिल्हा लातूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक पाटील हे करीत आहेत.


No comments:

Post a Comment

Advertise