गाडीच्या डिक्कीतून मोबाइलसह चांदीचे ब्रेसलेट व पैंजणची चोरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 17, 2019

गाडीच्या डिक्कीतून मोबाइलसह चांदीचे ब्रेसलेट व पैंजणची चोरी.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : डुप्लिकेट चावी चा वापर करून गाडीच्या खिडकीतून मोबाईल चोरून नेल्याची घटना जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुनंदा भीमाशंकर चेंडके, (वय-३४) रा. कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांच्या गाडीच्या डिकी मधून कोणीतरी अज्ञात चोरट्याने डुप्लिकेट चावी चा वापर केला. व त्या डुप्लिकेट चावी ने डिग्गी उघडून फिर्यादी सुनंदा चेंडके यांचा २३,५०० रुपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल ,पाचशे रुपये रोख रक्कम व तसेच चांदीचे ब्रेसलेट व पैंजण असा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. हे घटना १५ डिसेंबर रोजी दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान ग्रामीण पोलीस हेडकॉटर जवळील घडली. या घटनेची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली असून,अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील पोहघुगे हे करीत आहेत.
आमच्या दैनिक माणदेश एक्सप्रेस whats App ग्रुप मध्ये Join होण्यासाठी Click करा

No comments:

Post a Comment

Advertise