संजय देशमुख यांचे नाव आघाडीवर. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 3, 2019

संजय देशमुख यांचे नाव आघाडीवर.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सरचिटणीस संजय देशमुख यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये चर्चा चालू असून संजय देशमुख समर्थकही कामाला लागलेले आहेत. 
लोकसभा व विधानसभेच्या वेळी संजय देशमुख यांनी भरीव असे काम करून भारतीय जनता पार्टीचे जाळे माळशिरस तालुक्यामध्ये विणण्याकरता मोठे योगदान आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. माळशिरस तालुक्यांमध्ये भारतीय जनता पक्ष वाढविण्यामध्ये संजय देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे. संजय देशमुख यांनी अहोरात्र भारतीय जनता पार्टीचे काम करून आपल्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पडली असल्याने वरिष्ठांचाही त्यांच्यावर दृढविश्वास झालेला आहे. कार्यकर्त्यांमधूनही संजय देशमुख यांचे काम कौतुकास्पद असल्यामुळे त्यांच्या नावाला पसंती येत आहे. संजय देशमुख यांनी माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारीही यशस्वीपणे केलेली असल्याने सध्या माळशिरस तालुक्यामध्ये दोन्ही गटांना सामावून घेण्याकरता संजय देशमुख सारखा मुरबी तालुका अध्यक्ष असणे गरजेचे आहे. सध्या माळशिरस तालुक्यामध्ये आगामी काळात पंचायत समित्या जिल्हा परिषद नगरपंचायत अशा निवडणुका येणार आहेत या काळामध्ये गटातटाचे राजकारण होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी घेणार आणि सर्वसमावेशक असणारे संजय देशमुख यांच्या गळ्यामध्ये माळशिरस तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी पडण्याची दाट शक्यता आहे. तालुका अध्यक्ष पदानंतर सरचिटणीस पदाला भारतीय जनता पार्टीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असते अध्यक्षपदासाठी सरचिटणीस हे खऱ्या अर्थाने प्रबळ दावेदार असू शकतात. कारण त्यांचा सर्व कार्यकर्त्यांशी व नेत्यांशी संपर्क आलेला असतो. त्यामुळे सध्या त्यांचे पारडे जड मानले जात आहे.
आजपर्यंत जी पक्षाने जबाबदारी दिलेली आहे ती प्रामाणिकपणे पार पडलेली आहे. पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करणार. जरी, पक्षाने ही जबाबदारी दिली तरीसुद्धा मी स्वीकारण्यास तयार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise