आनंद एकतपुरे यांची निवड. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 3, 2019

आनंद एकतपुरे यांची निवड.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
अकलूज :  बहुजन युवा ब्रिगेड संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी आनंद एकतपुरे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र बहुजन ब्रिगेडचे प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी देऊन त्यांची निवड जाहीर केली.
बहुजन ब्रिगेड संघटनेची ध्येय धोरणे, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करावा तसेच बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाजामध्ये एकी प्रस्थापित करावी, समाजामध्ये संघटनेचे नाव उज्वल होण्यासाठी आपल्या हातून चांगले काम व्हावे त्याच प्रमाणे संघटनेचे जाळे आपण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र निर्माण करण्याचे मार्गदर्शन प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी निवडी प्रसंगी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा संघटक नानासाहेब खंडाळे, जिल्हाउपाध्यक्ष राजेश खरे, अशोक एकतपुरे, सागर अंकुशराव, आनंद मिसाळ, रफिक मुलाणी, उदय कांबळे, इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise