आम. अनिलभाऊ यांना मंत्रिपद न मिळाल्याने शिवसैनिक आक्रमक; तालुक्यातील सर्व पदाधिकारी सामुहिक राजीनामे देण्याच्या तयारीत : साहेबराव पाटील. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 31, 2019

आम. अनिलभाऊ यांना मंत्रिपद न मिळाल्याने शिवसैनिक आक्रमक; तालुक्यातील सर्व पदाधिकारी सामुहिक राजीनामे देण्याच्या तयारीत : साहेबराव पाटील.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी/प्रतिनिधी : आम. अनिलभाऊ बाबर यांना मंत्रिपद न मिळाल्याने आटपाडी तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक झाले असून सामुहिक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे आटपाडी तालुका शिवसेनाप्रमुख साहेबराव पाटील म्हणाले. 
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातून शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून अनिलभाऊ बाबर हे तब्बल २३ हजार फरकाच्या मतधिक्याने सलग दुसऱ्यांदा निवडून आले होते. तसेच ते अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची जिल्ह्यात व विधानसभेत ओळख असल्याने त्यांचा ठाकरे सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांचा समावेश निश्चित होणार असे जिल्ह्यात वातावरण होते. तसेच संभाव्य मंत्रिमंडळ यादीमध्ये सुद्धा त्यांचे नाव येत असल्याने तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण होते. परंतु काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये  त्यांचा समावेश ण झाल्याने तालुक्यातील शिवसैनिक मात्र आक्रमक झाले असून जर पक्षाला आमची गरज नसेल तर आम्ही राजीनामा दिलेला बरा अशी शिवसैनिकांची भावना निर्माण झाली आहे.

आमदार अनिलभाऊ बाबर हे मुंबईत असल्याने ते मतदारसंघात परतल्यावर त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल
साहेबराव पाटील 
आटपाडी तालुका शिवसेनाप्रमुख

No comments:

Post a Comment

Advertise