Type Here to Get Search Results !

करण विजय‌ सिन्हा याची अमेरिकेत शिक्षणासाठी निवड.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
म्हसवड/अहमद मुल्ला : येथील‌ करण विजय‌ सिन्हा यांची अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मध्ये Political Management ह्या विषयावर डबल मास्टर्स हे दोन वर्षाचे शिक्षणासाठी निवड झाले बद्दल‌ येथील माणदेशी महिला बँक व माण =देशी फौंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, माणदेशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा, अहिंसा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष‌ नितिन दोशी यांनी करण सिन्हा याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील ऊच्च शिक्षणास शुभेच्छा दिल्या. माण या दुष्काळी भागातील करण सिन्हा यांना येथील जिल्हा परिषद शाळा ते थेट अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टन असा शिक्षणासाठी प्रवास करण्याचा योगायोग आला‌ आला आहे. विशेष बाब म्हणजे श्रीमती चेतना व विजय‌ सिन्हा या आई वडीलांच्या माध्यमातून करण यास लहानपणापासून समाजकारण आणि राजकारण  हे त्यांच्या अनुभवातील धडे मिळाले. 
करण सिन्हा यांनी इयता पहिली ते दहावी पर्यंतच्या जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षण घेतले. पुढे पुणे येथील‌ फर्ग्युसन, मिठीबाई व नंतर मुंबई विद्यापीठ अशा वेगवेगळ्या संस्थामध्ये राज्यशास्त्र या विषयावर अभ्यास केला. राज्यशास्त्र हा विषय लहानपणापासूनच आवडीचा होता. फर्ग्युसन कॉलेज मध्ये राज्यशास्त्र पदवी घेताच पुढे महात्मा गांधी,गणेश आगरकर रविंद्रनाथ टागोर यांचे विचाराने प्रेरीत होऊन मुंबई विद्यापीठात "मास्टर्स इन महात्मा गांधी" आणि "आंतरराष्ट्रीय राजकारण" या विषयावर त्यांने अभ्यास केला.
करण सिन्हा यास अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी संधी मिळाल्या बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांसह त्याच्या असंख्य संख्येने युवा मित्रांनी अभिनंदन करुन त्यास पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठ दोन वर्ष शिक्षण घेणार आहे. ह्या सर्व प्रवासात माझ्या घरच्यांचा तर मोठा वाटा आहेच पण इथले शेतकरी, इथली तरुण मुलं आणि ह्या माणदेशाचा  पण मोलाचा वाटा आहे. दोन वर्षानंतर मायदेशात म्हणजेच माझ्या माणदेशात परत येऊन सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे मी ठरवले आहे. जे काही या दोन वर्षात मी अमेरिकेत जाऊन शिकणार आहे त्याचा उपयोग या भारत देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी नक्कीच करीन.
करण सिन्हा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies