डॉ. सौ. भूमिका बेरगळ यांची सभापतीपदी निवड : उपसभापतीपदी रुपेशकुमार पाटील यांची निवड ; पंचायत समितीवर भाजपची सत्ता कायम. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 31, 2019

डॉ. सौ. भूमिका बेरगळ यांची सभापतीपदी निवड : उपसभापतीपदी रुपेशकुमार पाटील यांची निवड ; पंचायत समितीवर भाजपची सत्ता कायम.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी/प्रतिनिधी :आटपाडी पंचायत समितीच्या सभापती म्हणून डॉ भूमिका प्रताप बेरगळ तर तर उपसभापती म्हणून रुपेशकुमार माणिकराव पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने आटपाडी पंचायत समितीवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला. तर पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण महिला नागरिकांच्या प्रवर्गासाठी असल्याने या पदासाठी दिघंची गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या सौ. उषा कलाप्पा कुटे यांनी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यामुळे निवडणूक झाली. यात  भूमिका बेरगळ यांना सहा मते पडली तर उषा कुटे यांना दोन मते पडली. त्यामुळे सभापतीपदी भूमिका बेरगळ यांची निवड जाहीर करण्यात आली. 
आटपाडी पंचायतीचे एकूण 8 सदस्य आहेत त्यापैकी 1 राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस चा 1 तर भाजपचे सहा सदस्य आहेत. आटपाडी पंचायत समितीमध्ये माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख गटाच्या सदस्यांना सभापती व उपसभापती पदाचा बहुमान मिळाला. माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख व युवा नेते गोपीचंद पडळकर यांच्या गटाची सत्ता पंचायत समितीत आहे. विद्यमान सभापती हर्षवर्धन देशमुख व उपसभापती सौ. पुष्पा सरगर यांचा कालावधी संपल्यानंतर आजची निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी मधुकर देशमुख यांनी काम पाहि.ले निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. यावेळी माणगंगा साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन भगवानराव मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, बाबासाहेब देशमुख बँकेचे चेअरमन दादासाहेब पाटील, माजी सभापती हरिभाऊ माने, माजी उपसभापती अशोक माळी, श्रीरंग कदम, जयवंत सरगर, बाजार समितीचे संचालक विष्णू अर्जुन यांच्यासह विविध मान्यवर हजर होते.
सभापती सौ. भूमिका प्रताप बेरगळ यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती. परंतु त्यांच्याकडे नागरिकांच्या मागास प्रवर्ग या पदासाठी जातीचे प्रमाणपत्र असल्याने त्यांची उमेदवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरविली. त्यामुळे त्यांच्यावर अर्जावर घेण्यात आलेली हरकत नामंजूर करण्यात आली.
सभापती पदासाठी महिला मागास प्रवर्ग आरक्षण पडले होते. त दिघंची गटातून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सौ. उषा कलाप्पा कुटे ह्या एकमेव सदस्या महिलांचा मागास प्रवर्ग या गणातून निवडून आलेल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी या पदावर दावा दाखल करून सौ. कुटे यांचा सभापती पदाचा अर्ज दाखल केला होता. तसेच त्यांनी भूमिका बेरगळ यांच्या अर्जावर हरकत घेतली होती परंतु ती नामंजूर करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा कुटे यांचा अर्ज सभापतीपदासाठी अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे काही काळ वातावरण गरम झाले होते. त्यामुळे बराच वेळ कार्यकर्त्यांना ताटकळत बसावे लागले. 

No comments:

Post a Comment

Advertise