पैशाच्या कारणावरून मारहाण ; दोघांविरुध्द गुन्हा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 14, 2019

पैशाच्या कारणावरून मारहाण ; दोघांविरुध्द गुन्हा.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सोलापूर प्रतिनिधी :पैशाच्या कारणावरून दारू पिऊन दोघांना मारहाण केल्यामुळे दोघांविरुध्द सदर बाझार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे़. याबाबत विश्वनाथ चोवडप्पा म्हेत्रे (वय २९,रा.भारतरत्न इंदिरा नगर, शाळा नंबर ५) यांनी फिर्याद दिली असून याबाबात अधिक माहिती अशी की, घेतलेले पैसे अद्याप पर्यंत का दिले नाही म्हणून श्रीशैल रामचंद्र वास्ते, सिध्दाराम रामचंद्र वास्ते या दोघांनी मिळून दारू पिऊन येऊन विश्वनाथ म्हेत्रे यांच्या वडीलांना आणि भावाला मारहाण केले. यामुळे फिर्यादी विश्वनाथ यांनी वडीलांना का मारहाण केले असे विचारण्यास गेले असता त्यांनाही हाताने आणि लाथाबुक्यांनी मारहाण करत डोक्यात दगडाने मारून जखमी केले. याबाबत विश्वनाथ म्हेत्रे यांनी सदर बाझार पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे़. या फिर्यादीवरून श्रीशैल वास्ते, सिध्दाराम वास्ते यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. ही घटना बुधवारी घडली. घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक तांबोळी हे करत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise