कायझन अॉटो कार्सचे शोरूम फोडून चार लाख रुपयांची चोरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 14, 2019

कायझन अॉटो कार्सचे शोरूम फोडून चार लाख रुपयांची चोरी.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सोलापूर प्रतिनिधी :कॅश असलेले ड्रावर उचकटत कायझन आॅटो कार्स शोरूम मधील चार लाख रुपयांची चोरी करण्यात आल्याची घटना फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली.याबाबत सुरेंद्र बसवराज शिरकोळी (वय ३६,रा.सुधेश विहार, आॅफिसर्स काॅलनी, गांधी शोरूम पाठीमागे) यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, केगांव येथील कायझन आॅटो कार्स या शोरूम मधील कॅशीयर रुम फोडून ड्रावर मधील रोख तीन लाख ८१ हजार रुपयांची चोरी झाली.ही घटना गुरूवारी रात्री ७ ते शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.ही घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जेव्हा सफाई कर्मचारी सफाई करण्यास कॅशियर रुम मध्ये आल्यानंतर उघडलीस आली.आपल्या शोरूममध्ये चोरी झाल्याचे संशय येताच सफाई कर्मचाऱ्यांने मॅनेंजर सुरेंद्र शिरकोळी यांना सांगितले.सुरेंद्र यांनी सीसीटीव्ही तपासले असता एका अज्ञात व्यक्तीचे ड्रावर उचकटल्याचे आढळले आहे.यामुळे अज्ञात चोरा विरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत सुरेंद्र बसवराज शिरकोळी यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise