विवाहितेस पैशाची मागणी ; पती सह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 14, 2019

विवाहितेस पैशाची मागणी ; पती सह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सोलापूर प्रतिनिधी : मला मेडीकल चालु करायचे आहे माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून पत्नीचा छळ करणाऱ्या पतीसह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ममता व्यंकटेश पद्मा (वय २४, रा. श्री जी नगर , गोडादरा, सुरत राज्य. गुजरात, सध्या राहण्यास सोलापूरात ) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ममता यांचा विवाह २४ डिसेंबर २०१६ रोजी गुजरात येथील व्यंकटेश प्रकाश पद्मा यांच्याशी झाला होता.लग्नानंतर पाच सहा महिने नवऱ्याने आणि त्यांच्या कुटूंबियाने चांगले नादंवून घेतले.त्यानंतर मात्र व्यंकटेश यांचे कुटूंबियांनी छोट्या छोट्या कारणामुळे फिर्यादीस टोचून बोलणे आणि  शिवीगाळ करू लागले.आणि फिर्यादी ममताच्या सौंदर्याविषयी टिका टीपनी करू लागले.दरम्यान, पती व्यंकटेश याने मला मेडीकल चालु करायचे आहे़ तुझ्या घरून पाच लाख रुपये घेऊन ये नाहीतर तु माझ्याकडे राहायचे नाही अशी दमदाटी देऊन हकलून दिले.यामुळे ममता यांनी आपल्या कुटूंबियांना झालेली घटना सांगितले.यानंतर ममताच्या वडील आणि मामांनी पतीची समजूत काढण्यासाठी गेले असता त्यांनीही व्यंकटेश याने उलट सुलट उत्तरे देत पाच लाख रुपये घेऊन या नाहीतर मुलीला घेऊन जा असे म्हणत अश्लिल शिव्या देऊन हकलून दिले.यामुळे ममता पद्मा यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती व्यंकटेश प्रकाश पद्मा, पुष्पावती प्रकाश पद्मा,अंबिका नरेश आडेप,राधिका राजू वन्नल,अवंतिका रवी लगशेट्टी, प्रकाश सिद्राम पद्मा सर्व राहणार गुजरात यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

No comments:

Post a Comment

Advertise