खरसुंडीच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट; २० हजार किमतीचे ३ मोबाईल चोरीला. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 10, 2019

खरसुंडीच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट; २० हजार किमतीचे ३ मोबाईल चोरीला.

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : खरसुंडी  येथील आठवडी बाजारामध्ये मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून चोरट्यांनी किंमती मोबाईलवर डल्ला मारला आहे. याबाबत बाळू दाजी वाघमोडे वय वर्षे ४०  रा. घाणंद यांनी पोलीस ठाणेस फिर्याद दिली आहे. 
आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागांमध्ये खरसुंडी हे मोठे गाव असून गावचा आठवडी बाजार मोठा भरतो. या आठवडी बाजाराचा गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी सुभाष रामचंद्र अर्जुन रा. कानकात्रेवाडी, दिनकर बाबुराव निकम रा. चिंचाळे यांचा अज्ञात चोरट्यांनी शर्टाचे वरील खिशात ठेवलेला मोबाईल लंपास केला.
यामध्ये विवो कंपनीचा सात हजार रुपये, सॅमसंग कंपनीचा आठ हजार रुपये व दुसरा एक सॅमसंग कंपनीचा पाच हजार रुपये  असा एकूण 20 हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरट्यांनी  लंपास केले. याबाबत खरसुंडी पोलीस दूरक्षेत्र येथे तक्रार देण्यात आली असून अधिक तपास पोना बेंबडे करीत आहे.

No comments:

Post a Comment

Advertise