आटपाडीत विक्रमी 226 जणांचे रक्तदान ; आटपाडीचे युवा नेते दिग्विजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते रक्तदान शिबिराचे आयोजन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 11, 2019

आटपाडीत विक्रमी 226 जणांचे रक्तदान ; आटपाडीचे युवा नेते दिग्विजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते रक्तदान शिबिराचे आयोजन.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीचे युवा नेते दिग्विजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वैभवदादा माळी मित्रपरिवाराने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये  विक्रमी २२६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रेवनिल ब्लड बँक सांगोला यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर संत सावता माळी मंदिर आटपाडी मध्ये घेण्यात आले.
आटपाडी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अशोक माळी, जि.प. सदस्य अरुण बालटे, वैभवदादा माळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य ऋषिकेश देशमुख, माजी पं.स. उपसभापती भागवत माळी, बापूराव फुले, विक्रमवीर कुमार माळी मान्यवर उपस्थित होते. 
या रक्तदान शिबिरामध्ये विक्रमी 226 जणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. रक्तदान करण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. सर्व रक्तदाते उत्स्फूर्तपणे रक्तदान करत होते तर, एका बाजूला रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप व आयोजकांकडून प्रोत्साहनपर हेल्मेट/कुकर/ बॅग ,यापैकी एक वस्तू भेट स्वरूपात देण्यात आली 
तसेच यावेळी सर्व रक्तदात्यांमधून एका भाग्यवान विजेता सोमनाथ जाधव  याला रेंजर सायकल भेट देण्यात आली. यावेळी रक्तदान केलेल्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment

Advertise