शिक्षक भारतीच्या आटपाडी तालुकाध्यक्षपदी सुरेश कदम यांची निवड. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 10, 2019

शिक्षक भारतीच्या आटपाडी तालुकाध्यक्षपदी सुरेश कदम यांची निवड.

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आमदार कपिल भारती यांच्या शिक्षक भारती संघटनेची आटपाडी तालुका कार्यकारणी निवड व शिक्षक समस्यांचा निपटारा करणे संबंधी राजारामबापू हायस्कूल आटपाडी येथे दि. ७ रोजी जिल्हाध्यक्ष सुधाकर माने व विभागीय मार्गदर्शक जी.एस. पाटील (आप्पा) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या वेळी नूतन तालुकाध्यक्ष म्हणून न्यू हायस्कूल घरनिकी येथे कार्यरत असणारे सुरेश कदम यांची एकमताने निवड करण्यात आली.
या बैठकीत शिक्षकांना सेवेत येणाऱ्या अडचणी तसेच जुनी पेन्शन संबंधी निर्णय, मेडिकल बिले, वरिष्ठ श्रेणी, निवडश्रेणी, सेवा पुस्तके, स्टॅम्पिंग तसेच येत्या काळात शिक्षकांचा पगार नव्हे तर विद्यार्थी संख्येवर मानधन हा नवीन घातक निर्णय लागू न होऊ देणे यासाठी राज्यभर लढा उभारला जावा असे जी.एस. पाटील व सुधाकर माने तसेच शिक्षक भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भारती यांनी ठासून सांगितले. तर शिक्षकांच्या समस्या बाबत मच्छिंद्र पाटील, मच्छिंद्र शेजाळ, गणेश ऐवळे, सागर केंगार, नवनाथ जाधव, सौ. स्मिता नाकील, माणिक साळुंखे यांनी सेवेत आलेल्या व येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी संघटनेचे बळ हवे व आमदार कपिल पाटील यांची संघटना शिक्षणाच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीदवाक्य घेऊन राज्यभर आपले कार्यक्षेत्र निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा कार्यकारिणीतील महापालिका खजिनदार रतन कुंभार, कार्यक्षेत्र अध्यक्ष अरिफ गोलंदाज, महापालिका क्षेत्र सचिव सुरेश सपकाळ, के.बी. जाधव, एस.एल.पाटील, एस.एम.पाटील, अशोक सरक, विजय पिंजारी आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी शिक्षक भारतीची आटपाडी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये तालुका अध्यक्षपदी सुरेश कदम न्यू हायस्कूल घरनिकी, कार्याध्यक्षपदी मच्छिंद्र पाटील जीवनदीप विद्यामंदिर कामथ, उपाध्यक्षपदी भरत नलवडे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय झरे, नवनाथ जाधव पंडित दिनदयाल विद्यालय दिघंची, सचिवपदी मच्छिंद्र शेजाळ, पिंपरी हायस्कूल पिंपरी खुर्द, सहसचिवपदी सुरेश पुजारी धुळाजीराव झिंबल विद्यालय लिंगीवरे, किशोर चांदणे गदिमा हायस्कूल माडगुळे, खजिनदारपदी महादेव देवकर राजारामबापू हायस्कूल आटपाडी, जिल्हा सहसचिवपदी सुरेश कटरे आदर्श विद्यामंदिर खरसुंडी, संतोष कोळवले पिंपरी हायस्कूल पिंपरी खुर्द तर सदस्य म्हणून सागर केंगार, विलास कदम, गणेश जाधव, राहुल सोनवणे, गणेश कबीर, बालेखान मुलाणी यांची निवड करण्यात आली.
महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सौ. कविता चव्हाण न्यू हायस्कूल घरनिकी यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सौ. साधना साळुंखे घाणंद हायस्कूल घाणंद, सचिव मंगल कोरवी, राजाराम बापू हायस्कूल आटपाडी, सहसचिव सौ. स्मिता नाकील यांच्या निवडी करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कविता चव्हाण यांनी केले. तर सूत्रसंचालन दादासाहेब मोटे व आभार मच्छिंद्र शेजाळ यांनी मानले. 

No comments:

Post a Comment

Advertise