शिवशंभो बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात पार पडला. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 25, 2019

शिवशंभो बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात पार पडला.

        
माणदेश एक्सप्रेस न्यूज 
दिघंची : शिवशंभो बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दिघंची. २३ डिसेंबर २०१९ रोजी संस्थेचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला.या संस्थे अंतर्गत सदाशिवराव शिंदे इग्लिश मिडिअम स्कुल पांढरेवाडी या शाळेने संस्थेच्या वर्धापनदिना निमित्त उंबरगाव , इटकी, पुजारवाडी, दिघंची  ,खवसपुर या गावात जाउन गावातील ग्रामपंचायत सरपंच , ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मिळुन शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता अभियान राबवले .
              संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले .२३ डिसेंबर २०१९ वार सोमवार या दिवशी विद्यार्थ्यांच्या कडुन आठवडी बाजार भरवण्यात आला .याच दिवशी महिलांसाठी संगीत खुर्चीचा कार्यक्रम राबवण्यात आला .तसेच महीलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला .येणार्या पाहुण्यांसाठी तसेच पालकांसाठी संस्थेतर्फे चहा नाष्टा याची सोय करण्यात आली होती.
    आठवडी बाजारात चिमुकल्यांनी विविध प्रकारचे साहित्य तसेच भाजी-पाला ,खाऊचे स्टाॅल त्याचबरोबर ग्रहपयोगी साहीत्य विक्रिसाठी आणले होते. यातून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ व्हावी या हेतुने संस्थेने या उपक्रमाचे आयोजन केले होते .तसेच महीलांसाठी हळदी कुंकु ,संगीतखुर्ची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    या  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन पुजारवाडी गावचे सरपंच श्री .ब्रम्हदेव होनमाने ,उंबरगावचे सरपंच श्री शिवाजी कुचेकर , इटकी गावचे सरपंच जगन्नाथ गळवे   तसेच या सर्व गावचे ग्रामसेवक, उपसरपंच,गावचे पोलीसपाटील व उपस्थित पालक तसेच दिघंची गावचे सरपंच श्री अमोल मोरे ,उपसरपंच श्री विकास मोरे ,दिघंची ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रकाशभैय्या शिंदे , सदस्य श्री.जितेंद्र मोरे-पाटील ,श्री रुशीकेश गुरव ,श्री अनुप दुधाळ .संस्थेचे संस्थापक श्री.श्रीरंगभाऊ शिंदे , संस्थेचे सदस्य रणजित शिंदे सर ,दिघंची गावचे युवा नेते श्री अशोकराजे देशमुख ,श्री शिवाजी पवार इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य श्री दिलीप पिंजारी सर, सुरज वाघमारे सर ,सौ.राणी जाधव मॅडम,सौ. ज्योती यादव मॅडम,सौ.राणी डोके मॅडम,सौ ऐवळे मॅडम,नितीन माळी ,राजश्री गाढवे मॅडम ,वाघमारे मॅडम तसेच  शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या नियोजनाने हा वर्धापनदिन सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.
No comments:

Post a Comment

Advertise