28 डिसेंबर रोजी "निवडुंग " या गझलसंग्रहाचा लोकार्पण सोहळा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 25, 2019

28 डिसेंबर रोजी "निवडुंग " या गझलसंग्रहाचा लोकार्पण सोहळा.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
पुणे प्रतिनिधी : कवी,व्याख्याते,नाट्यगीतकार,निवेदक, गझलकार मराठी भाषेचे अभ्यासक दत्तप्रसाद जोग यांचा पुथ्वीराज प्रकाशन पुणे तर्फे प्रकाशित ' निवडुंग ' या गझल संग्रहाचे प्रकाशन शनिवारी दि. 28 डिसेंबर रोजी पत्रकार भवन, पुणे येथे सायं. 4.30 वाजता होणार आहे. 
        मुक्ताई प्रतिष्ठान पुणे व प्रथमेश क्रिएशन्स गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात जेष्ठ गझलकार प्रशांत वैद्य, म.भा. चव्हाण, भूषण कटककर, नितीन देशमुख आणि ग. दि. मा. प्रतिष्ठानचे सुमित्र माडगूळकर याच्या हस्ते या गझल संग्रहाचे प्रकाशन होणार आहे.
 " रुजतो रुजायचे तर मर्जीत आपल्या तो "
"निवडुंग पावसाचे उपकार घेत नाही " - दत्तप्रसाद जोग .  अश्या आशयसंपन्न व अप्रतिम अश्या गझलांनी परिपूर्ण असलेला हा गझलसंग्रह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.प्रथमेश क्रिएशन्स गोवा तर्फे, मराठी गझल मुशायरा " रंग माझा वेगळा " हा कार्यक्रम दोन सत्रात सादर होणार आहे. प्रथम सत्रात : चंद्रशेखर गावस, अश्विनी आपटे, वैशाली माळी, श्रद्धा खानविलकर, अमृता जोशी, रवी कांबळे, उत्तरा जोशी, मंदार खरे आणि महेश जाधव  हे गझल सादर करणार आहेत. चैतन्य कुलकर्णी या सत्राचे निवेदक आहेत. द्वितीय सत्रात जेष्ठ गझलकार म.भा चव्हाण, मसुूद पटेल, नितीन देशमुख, अनंत राऊत, प्रशांत वैद्य निवेदक भूषण कटककर (बेफिकीर) संजय गोर्डे आणि दत्तप्रसाद जोग सहभागी होणार आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise