पडघा टी. ए. पाटील इंग्रजी शाळेचा विज्ञान प्रदर्शन मोठया उत्साहात. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 25, 2019

पडघा टी. ए. पाटील इंग्रजी शाळेचा विज्ञान प्रदर्शन मोठया उत्साहात.


भिवंडी प्रतिनिधी
मिलिंद जाधव : विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विविध शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शन भरविण्यास सुरुवात झाली असून भिवंडी तालुक्यातील पडघा येथील टी. ए. पाटील  इंग्रजी शाळेत  विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन २३ ते २४  डिसेंबर २०१९ रोजी पडघा  ग्रामपंचायत सभागृहात  करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे  उद्घाटन पडघा ग्रामपंचायच्या  प्रभारी सरपंच सुगंधा पारधी, जीवन विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शशांक तांबोळी, सदस्य संदेश पाटील ,कार्याध्यक्ष  अर्चना महाजन, खजिनदार यशवंत गायकवाड यांच्या हस्ते  करण्यात आले. शाळेअंतर्गत असलेल्या या विज्ञान प्रदर्शनात शाळेतील  तिसरी ते दहावीच्या एकूण  २००  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून  ४८  विज्ञान प्रकल्प  विद्यार्थ्यांनी साकारले होते. 

           पर्यावरणाची जाणीव करून देणाऱ्या व विज्ञानाचा प्रसार व्हावा अशा विषयांवर आधारित प्रकल्पांचा देखावा या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारलेले पाहायला मिळाला . आधुनिकतेची कास धरत अनेक विषयांची माहिती विद्यार्थ्यांबरोबरच जनसामान्यांना व्हावी यासाठी आकर्षक प्रकल्प या विज्ञान प्रदर्शनातं विद्यार्थ्यांनी साकारली होती. त्यामुळे हा विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी  पालकांनी तसेच पडघा परिसरातील नागरिकांनी या विज्ञान प्रदर्शनात हजेरी लावली होती. विज्ञान प्रकल्प उभारलेल्या स्टॉलवर प्रत्येक विद्यार्थी अचूक अशी माहिती देत असल्याने त्यांच्याकडे पालक वर्गाकडून कुतूहलाने बघण्यात येत होते. जागतिक उष्मिकरण, पर्यावरण , पृथ्वीवर मानवाला जिवंत ठेवण्याचे प्रकल्प, पाण्याची बचत , विकसित शहरं , वृक्षारोपण , टाकाऊ पासून टिकाऊ, विजेची बचत, पाणी बचत, अशा अनेक विषयांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांकडून बनविण्यात आले होते. यावेळी  महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार  शांताराम मोरे यांनी भेट देवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तर शालेय विज्ञान विभागाचे शिक्षक सुखदा महाजन,  हुमेरा ठाणावाला, अश्विनी व्यापारी, विवेक नागावेकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. यावेळी टी. ए. पाटील  इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र थोरात, उपमुख्याध्यापिका ममता शेलार, पदाधिकारी  उषा अगोणे, तृप्ती गंधे, अनिकेत थेटे ,विद्यार्थी शिक्षक व  शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच  पालक यांनी  विशेष परिश्रम घेतले.
 दरम्यान '' पर्यावरण स्वरक्षण जागृती त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थांचे शालेय जीवनापासून विज्ञान व पर्यावरणा संबंधी नातेसंबंध वाढावे यासाठी अशा विज्ञान प्रदर्शनाची अत्यंत आवश्यकता असून ही काळाची गरज आहे ''  असे मुख्याध्यापक रामचंद्र थोरात  यांनी बोलतांना सांगितले.No comments:

Post a Comment

Advertise