स्वेरीज् डी. फार्मसीच्या ग्रंथपाल सौ.प्रेरणा भोसले-वागज सेट परीक्षा उत्तीर्ण स्वेरीत झाला सत्कार. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 25, 2019

स्वेरीज् डी. फार्मसीच्या ग्रंथपाल सौ.प्रेरणा भोसले-वागज सेट परीक्षा उत्तीर्ण स्वेरीत झाला सत्कार.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
पंढरपूर प्रतिंनिधी : सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता (सेट) परीक्षेमध्ये ‘ग्रंथालय आणि माहितीशास्त्र’ या विषयामध्ये स्वेरीच्या डी.फार्मसीच्या ग्रंथपाल प्रेरणा शिवाजी भोसले-वागज यांनी सेट परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
       स्वेरी संचलित कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्मसी) महाविद्यालयात ग्रंथपाल पदावर गेल्या १५ वर्षापासून सौ.प्रेरणा भोसले-वागज ह्या काम पहात आहेत. शेटफळ (ता. मोहोळ) स्थित सौ.भोसले-वागज यांनी आपले घर आणि महाविद्यालयाचे कामकाज पाहून सेट परीक्षेचा अभ्यास केला आणि जिद्दीने उत्तुंग यश मिळविले. सौ. प्रेरणा यांना त्यांचे पती विलास वागज व त्यांचे कुटुंबीय तसेच स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे व स्वेरीचे सहकारी यांचे मार्गदर्शन लाभले. स्वेरीमध्ये रुजू झाल्यावर देखील संस्थेचे सचिव डॉ. बी.पी. रोंगे हे अधिक शिक्षण घेण्यासाठी सतत प्रेरणा व मार्गदर्शन करत असतात. त्यामुळेच स्वेरीचे अनेक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी हे नोकरी करत असतानाच उच्च शिक्षण घेत आहेत. ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे. याचाच फायदा सौ. प्रेरणा भोसले यांनी घेतला आणि सेट परीक्षेत यश मिळविले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर.बी. रिसवडकर तसेच स्वेरी व्यवस्थापनातील पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, अभियांत्रिकीचे सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी सौ. प्रेरणा भोसले-वागज  यांचे अभिनंदन केले.
छायाचित्र- स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीच्या ग्रंथपाल सौ. प्रेरणा भोसले- वागज यांचा सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे स्वेरीच्या वतीने सिव्हील इंजिनिअरींगच्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोबत डावीकडून  प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल व डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे.


No comments:

Post a Comment

Advertise